upi down saam tv
महाराष्ट्र

UPI Down: युपीआयची सेवा चार पाच तासासाठी बंद पडली, काय आहेत पर्याय?

UPI Down: युपीआयची सेवा चार पाच तासासाठी बंद पडली आणि त्याचा थेट फटका Online transaction ला बसला. काही तांत्रिक अडचणीमुळे ही सेवा विस्कळीत झाली आहे, असं जरी NPCI नं सांगितलं असलं तरी गेल्या वर्षभरात यूपीआय डाऊन होण्याची ही सहावी घटना आहे. हा प्रकार केवळ एकात बॅंकेपुरता मर्यादीत नव्हता तर अनेक बॅंकाना याचा फटका बसला. गेल्या २६ मार्चला देखील अडीच तासासाठी सेवा ठप्प झाली होती ाणि सर्व्हर अनअव्हीलेबल हाच मेसेज स्क्रीनवर झळकत होता.

Saam TV News

UPI डाऊन असेल तरी घाबरण्याची गरज नाही. तुमच्याकडे पेमेंट करण्याचे आणखी देखील पर्याय आहेत. त्यापैकी काही सोपे आणि विश्वासर्ह पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

डेबिट/क्रेडिट कार्ड

दुकानामधील POS मशिनवर कार्ड स्वाईप किंवा टॅप कराय. ऑनलाईन वेबसाईट्स किंवा अ‍ॅपवर कार्डचे डिटेल्स टाकून व्यवहार करा.

नेट बँकिंग

तुम्ही बँकेच्या वेबसाईट किंवा अ‍ॅपवरुन थेट पेमेंट करु शकता. ऑनलाईन शॉपिंग किंवा बिल पेमेंट करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.

मोबाइल वॉलेट्स (Wallet Apps)

Paytm, PhonePe Wallet, Mobikwik, Amazon Pay यामध्ये पूर्वी पैसे ठेवले असतील तर ते QR कोड स्कॅन करुन मोबाईल नंबरवर पाठवू शकता.

चेक / डिमांड ड्राफ्ट

मोठी रक्कम किंवा व्यवहारामधील देवाण-घेवण करण्यासाठी चेक किंवा डिमांड ड्राफ्टचा वापर देखील विश्वासर्ह आणि सुरक्षित आहे.

कॅश (रोख रक्कम)

डिजिटल पेमेंट होत नसेल तर तुम्ही रोख रक्कम अदा करुन देखील तुमचा व्यवहार पूर्ण करु शकता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

SCROLL FOR NEXT