Maharashtra Rain Update SAAM TV
महाराष्ट्र

Rain Update: अरेच्चा, स्वेटर घालावा की रेनकोट? हिवाळ्यात पावसाचा धुमाकूळ; कोणकोणत्या जिल्ह्यांना झोडपलं?

Rain Update News in Maharashtra: देशभरासह राज्यात हिवाळ्यातही पावसानं झोडपलं. हिवाळ्यात पाऊस पडत असल्यामुळं जणू हिवसाळा सुरू असल्याची प्रतिक्रिया लोक देत आहेत. मात्र यामुळे पिकांचे नुकसान झालं आहे.

Bhagyashree Kamble

देशभरासह राज्यात हिवाळ्यातही पावसाळा सुरु आहे. हिवाळ्यात पाऊस पडत असल्यामुळे जणू हिवसाळा सुरू असल्याची प्रतिक्रिया लोक देत आहेत. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे, राज्यातील काही भागांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला. यवतमाळ, धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. राज्यात नेमकं कुठे कुठे हिवसाळा सुरूय जाणून घ्या.

धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरामध्ये अवकाळी पावसानं जोरदार बॅटींग केली. हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार साक्री तालुक्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. तसेच धुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये दुपारच्या सुमारास अवकाळी पाऊस पडला. अवकाळी पाऊस पडल्यानं नागरिकांची तारंबळ उडाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील काकदा परिसरात तुफान पाऊस पडला. काकडदा परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली. हवामान विभागानं दिलेल्या येलो अलर्टनंतर नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसानं जोरदार बॅटिंग केली. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात होणार असल्याची माहिती आहे.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसाचा गारपीट, पाऊस आणि वादळाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यवतमाळ, पुसद, आर्णी, उमरखेड या तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसला. जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे तुर आणि रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हवामान विभागाकडून दिलेल्या इशार्‍यानुसार जळगावात पावसानं हजेरी लावली. जळगाव शहरासह रावेर चाळीसगावात जोरदार पाऊस बरसला. अचानक जोरदार पावसाला सुरूवात झाल्यानं जनजीवन विस्कळीत झाले. तसेच शेत पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरीवर्ग चितिंत असल्याची माहिती आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा सूचनाही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Ornaments: कोणत्या लोकांनी सोनं घालू नये? कारण एकदा वाचाच

Manoj Jarange Patil Protest Live Updates : आझाद मैदानात एका तरुणाचा फाशी घेण्याचा प्रयत्न

Manoj Jarange: मनोज जरांगेंना ओबीसीमधूनच आरक्षण का हवय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजने’वरून जरांगे पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पूर्ण पाठिंबा - छत्रपती संभाजीराजे

SCROLL FOR NEXT