Maharashtra Unseasonal Rain Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Unseasonal Rain: राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा; अमरावतीत पिकांचे मोठे नुकसान, घरावरील छप्पर गेले उडून

Maharashtra Unseasonal Rain: राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनत नुकसान झालं आहे.

Vishal Gangurde

अमर घटारे

Maharashtra Unseasonal Rain News: राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनत नुकसान झालं आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा बंद पडला आहे. अमरावतीमध्येही पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. अमरावतीत लिंबू ,आंबा, गहू,संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. (Latest Marathi News)

काल मध्यरात्री अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह अमरावती शहरात जोरदार हजेरी लावली. यामध्ये शहरातील अनेक झाडे कोलमडून पडल्याने शहरा रस्ते बंद झाली होती. तर तुटून पडलेली झाडे ही विद्युत वाहिनीच्या खांबावर पडल्याने शहरातील काही भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. सोबतच अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वार्ड मध्ये सुद्धा पाणी शिरल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती.

या वादळी पावसामुळे अनेक घरांची पडझड झालेली पाहायला मिळाली. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी घरावरील छप्पर उडून गेले आहेत. तर अनेक दुकानात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झाले.

अमरावती जिल्ह्यात या वादळी पावसामुळे संत्रा, लिंबू, आंबा, गहू या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर लिंबू, संत्रा, आंबा वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर गळून पडले. त्यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी पुन्हा हवालदिल झाला. अमरावती लगतच्या पिंपळखुटा येथील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण लिंबूची बागही कोलमडून पडल्याने संपूर्ण लिंबूची बाग उध्वस्त झाले आहेत.

अमरावती जिल्ह्यामध्ये एका महिन्यात पाच वेळा गारपीटीसह अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे सरकार पंचनामे पूर्ण करून केव्हा मदत देईल असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Maharashtra Election Result: पुणेकरांची पसंती कोणाला? पुण्यातील २१ आमदार पाहा एका क्लिकवर

Maharashtra Election : इंजिनाचा वेग मंदावला! राज ठाकरेंच्या मनसेच्या पराभवाची कारणं काय?

Eknath Shinde: शिंदेंची ताकद वाढली! अपक्ष आमदारासाठी थेट हेलिकॉप्टरच पाठवलं

Eknath Shinde Press Conference: साष्टांग दंडवत! शिंदे- फडणवीस- पवार लाडक्या मतदारांसमोर नतमस्तक; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT