बायकोचा हट्ट पुरवण्यासाठी नवरदेवाने काढली चक्क जेसीबी वर वरात! SaamTvNews
महाराष्ट्र

बायकोचा हट्ट पुरवण्यासाठी नवरदेवाने काढली चक्क जेसीबी वर वरात!

प्रत्येकाला आपलं लग्न कायम आठवणीत राहणारा क्षण बनावं अशी इच्छा असते.

अभिजित घोरमारे

भंडारा : प्रत्येकाला आपलं लग्न स्मरणीय आणि कायम आठवणीत राहणारा क्षण बनावं अशी इच्छा असते. लग्न कार्याचा सर्वात महत्वाचा क्षण म्हणजे वरात! प्रत्येकाला आपल्या लग्नाची वरात धुमधडाक्यात आणि हटके व्हावी अशी इच्छा असतेच. मग त्यासाठी लग्नाळू मंडळी, मोठ्या थाटा माटात घोड्यावर, आकर्षक रथात, हत्तीवर, महागड्या गाड्यांत अथवा पारंपरिक पद्धतीने बैल गाडीवर वरात काढत असल्याचे आपण पाहिले असेल.

मात्र, नवरी मुलीची भन्नाट कल्पना असल्याने आणि नवरी मुळीच हट्ट पुरविण्यासाठी भंडाऱ्यातील (Bhandara) एका नवरदेवाने चक्क जेसीबी वर वरात काढलीय..! भंडारा-नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खात गावातील सचिन निरगुळकर या मुलाचं लग्न प्रतीक्षा या मुलीशी आज सकाळी 10 वाजता ठरलेल्या वेळेवर झालं.

मग काय संध्याकाळी फिरती वरात गावात पोहचली व नवरी मुलीने हट्ट धरला मी जेसीबी वरच बसून घरी जाणार! नवे नवे लग्न आणि नववधूचा हट्ट पुरवण्यासाठी नवरदेवाने आगळ्या वेगळ्या पद्धतीने चक्क जेसीबी वर वरात काढली. जेसीबीवरून (JCB) आलेल्या नववधूचे सासरच्या मंडळींनी देखील मोठ्या थाटात स्वागत केले. ह्या अनोख्या वरातीची सगळीकडेच चर्चा आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

Blue Colour Saree: श्रावणात सणासुदींना नेसा 'या' सुंदर निळ्या रंगाच्या साडी, सगळ्यांच्या नजरा राहतील तुमच्यावरुन खिळून

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

SCROLL FOR NEXT