सदाभाऊ खोत यांच्याकडून फडणवीसांना आगळ्यावेगळ्या शुभेच्छा  विजय पाटील
महाराष्ट्र

सदाभाऊ खोत यांच्याकडून फडणवीसांना अनोख्या शुभेच्छा!

जलयुक्त शिवार बंधाऱ्यातून ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचे पूजन करत सदाभाऊ खोत यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : राज्यातील जलयुक्त शिवार कामांवर होत असलेले आरोप आणि चौकशीच्या पार्श्वभूमीवर माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जलयुक्त शिवारातुन ओसंडून वाहणाऱ्या बंधाऱ्यात उतरत पाण्याचे पूजन करत महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.

वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर या ठिकाणी सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनोख्या पद्धतीने जलयुक्त शिवार कामांचं स्वागत करत फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हे देखील पहा -

राज्यातील युती सरकारच्या काळात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारकडून चौकशी लावण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून झालेल्या कामांच्या ठिकाणी पाणी पूजन करत महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.

वाळवा तालुक्यातल्या मरळनाथपूर या ठिकाणी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात उतरून ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचे त्यांनी पूजन केले. तसेच राज्य सरकारकडून सुरू असलेल्या चौकशी वर बोलताना चौकशी काय करता, "भरलेल्या बंधाऱ्यात उड्या मारून पोहायला लागा, मग कळेल" असा टोला यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्या पश्चिम महाराष्ट्राची शिवसेना शिंदे गटाची बैठक

Pune : पुण्यात भीषण अपघात! कारची डंपरला धडक, इंजिनचा चक्काचूर झाल्यानंतर कारने पेट घेतला अन्...

तारूण्यातच हाडं खिळखळी? कंबर अन् गुडघेदुखीनं त्रस्त? खा १ पदार्थ, कॅल्शियमचा सुपरडोस

परिवहन मंत्र्यांकडे टेस्ला कार, प्रवाशांसाठी दरवाजा नसलेली ST; नागरिकांच्या जीवाशी खेळ, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Jiya Shankar Photos: हॉटनेसचा कहर! बोल्ड फोटोंवरून नजर हटणार नाही

SCROLL FOR NEXT