पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या पाठवून अनोखे आंदोलन विजय पाटील
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या पाठवून अनोखे आंदोलन

सांगलीत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने महागाईच्या विरोधात चूल पेटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून गोवऱ्या पाठवून अनोखे आंदोलन केले आहे.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली: सांगलीत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने महागाईच्या विरोधात चूल पेटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून गोवऱ्या पाठवून अनोखे आंदोलन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सांगली महिला आघाडीच्या वतीने केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर सहा महिन्यात दाम दुप्पट केल्याने या दरवाढीच्या निषेधार्थ हे आंदोलन केले आहे. (Unique agitation by sending cow dung to Prime Minister Narendra Modi)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय जिल्हा परिषदे समोर चूल पेटवून महिलांनी निदर्शने करत परिसर दणाणून सोडला. सदरचे आंदोलन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी विधानसभा क्षेत्र महिला अध्यक्ष डॉक्टर छाया जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रजिस्टर पोस्टाने गोवऱ्या पाठविण्यात येणार आहे. दरवाढीच्या विरोधात सतत आंदोलने केली जात आहे, पण केंद्र सरकारने कोणतीही दखल घेतलेली नाही.

या दरवाढीमुळं सर्वसामान्य महिलांचं बजेट कोलमडलेले आहे. त्यांना आता गॅस ऐवजी शेणाच्या गोवऱ्यांवर स्वयंपाक करावा लागत असल्याने या गोवऱ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवल्या असल्याचेही अध्यक्ष छाया जाधव यांनी सांगितले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

मुंबई-आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात, ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, १५ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT