अकोल्यात MIM चे सेल्फी काढो आंदोलन..!
अकोल्यात MIM चे सेल्फी काढो आंदोलन..! जयेश गावंडे
महाराष्ट्र

अकोल्यात MIM चे सेल्फी काढो आंदोलन..!

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तयार जाऊन जवळपास 2 वर्षे झाली आहेत. अजून पर्यंत हे रुग्णालय सुरू झाले नाही, अंतर्गत राजकारणामुळे हे रुग्णालय सुरू होत नसल्याने जिल्हातील रुग्णांना असुविधा होत आहे. जर, हे हॉस्पिटल सुरू झाले तर अकोला, बुलढाणा, वाशिम, या जिल्हातील रुग्णांना याचा फायदा होईल. हे रुग्णालय लवकरात लवकर सुरू करावे यासाठी आज स्पेशालिटी हॉस्पिटल समोर एमआयएम ने सेल्फी काढत अनोखे आंदोलन केले आहे.

हे देखील पहा -

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला जवळपास दोन वर्ष झाली आहे. दरम्यान कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी आरोग्य यंत्रणेने तिसरी लाटेचे सावट सर्वत्र असल्याने अकोला सामान्य रुग्णालयातच रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. कोरोना काळात बऱ्याच अडचणींना समोर जावे लागले. त्याच आधारे राज्य शासनाकडून अकोला जिल्ह्यासाठी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल ची निर्मिती करण्यात आली होती. बराच काळ लोटला आहे. मात्र, अद्यापपर्यंत या हॉस्पिटलचे लोकार्पण करण्यात आले नाही.

याबाबत अकोला एमआयएम ने बऱ्याचदा निवेदन दिले मात्र, या निवेदनांना केराची टोपली दाखवण्यात आली. त्यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी अकोल्यातील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या वास्तूला सेल्फी पॉईंट असे उपरोधिक नाव देत अनोखे आंदोलन केले. एमआयएम ने या आंदोलनातून अकोला प्रशासनाचे लक्ष वेधले. हे आंदोलन एमआयएम अकोला जिल्हा निरीक्षक डॉ.रहमान खान यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अब्दुल मुनाफ, आसिफ खान, जावेद पठाण, चांद खान, शेख वसीम तसेच एमआयएमचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghatkopar Hording Collapse: दुर्घटनास्थळीही नेत्यांचं राजकारण! घाटकोपर घटनास्थळी दोन भावी खासदार भिडले; VIDEO व्हायरल

Sanjay Raut News : नाशिकमध्ये 800 कोटी रुपयांचा घोटाळा, राऊतांचे पंतप्रधान मोदींना पत्र

Today's Marathi News Live : PM नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये जाहीर सभा, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Diabetes Control : 'या' चुकांमुळे तुम्हालाही होऊ शकतो डायबिटीज; आताच सावध व्हा

Pune Rain Update News : पुण्यात आज पुन्हा पावसाची शक्यता, ऑरेंज अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT