raosaheb danve
raosaheb danve  saam tv
महाराष्ट्र

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावर रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

लक्ष्मण सोळुंके

Raosaheb Danve News : आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. या दोघांच्या वादामुळे अमरावतीमधील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यांचा वादाचा परिणाम शिंदे गट आणि भाजप युतीवर देखील होत आहे. या दोघांचा वाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मध्यस्थी करणार आहेत. बच्चू कडू आणि राणा यांच्या वादावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे सध्या जालन्याच्या दौऱ्यावर आहेत. जालना-तिरुपती एक्सप्रेसच्या उदघाटनाप्रसंगी रेल्वे स्थानकावर आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दानवे म्हणाले, 'रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. ते दोघांना बसून वाद मिटवतील'.

दरम्यान, रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी नाना पटोले यांच्या वक्तव्याचा देखील खरपूस समाचार घेतला. नाना पटोले यांनी शिंदे सरकारमध्ये खदखद आहे. सरकारचा लवकरच अंत होणार आहे, असं वक्तव्य केलं होतं.पटोलेंना प्रत्युत्तर देताना दानवे म्हणाले, 'नाना पटोले (Nana Patole) यांचं वक्तव्य म्हणजे विरोधात गेल्यानंतर त्यांच्याकडील काही लोक आमच्याकडे येतील या भीतीने ते असं वक्तव्य करत आहेत. त्यामुळे राजकारणात अशा गोष्टी कराव्या लागतात'. अशा शब्दात समाचार घेत रावसाहेब दानवे यांनी नाना पटोलेंच्या वक्तव्यावर मत स्पष्ट केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Desi Jugad Viral Video: जबरदस्त देसी जुगाड! कारमध्येच लावली ऊसाच्या रसाची मशीन, VIDEO ची होतेय चर्चा

Viral Video: स्केटिंग करताना हिरोगिरी करणं पडलं महागात, तरुणाचे झाले असे हाल; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

kalyan Crime News : लग्नाला दिलेला नकार पोराला पचला नाही, रागाच्या भरात नको ते करून बसला!

Madhurani Gokhale : ‘आई कुठे काय करते’तल्या ‘अरुंधती’चं निस्सिम सौंदर्य

PM Modi Property: पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींच्या संपत्तीत किती झाली वाढ? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT