जालना: भरपावसात थंड वातावरणात चहा (Tea) पिण्याची मजा वेगळीच आहे. आज आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी भर पावसात विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून पंढरपूरात (Pandharpur) येतायत. जालन्यातूही हजारो वारकरी विठुमाऊलीच्या दर्शनासाठी भरपावसात पायी चालत पंढरपूरात दाखल झाले आहेत. जालना जिल्हातील या वारकऱ्यांना यंदा 'स्पेशल चहा' मिळाला आहे! त्याचं कारण म्हणजे खुद्द केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाणकाम राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी चहा तयार करून वारकऱ्यांना दिला आहे, त्यामुळे यंदा काही वारकऱ्यांना केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हातचा ;स्पेशल' चहा मिळाला आहे. (Raosaheb Danve Special Tea News)
हे देखील पाहा -
जालना जिह्याच्या भोकरदन तालुक्यातील शिरसगाव मंडप गावाचे ग्रामस्थ सुभाष वाघ यांनी आषाढी एकादशीनिमीत्त फिरते चहाचे हॉटेल पंढरपूरमध्ये लावले आहे. आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यात प्रत्येक विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी ते चहाची छोटीशी टपरी लावतात. आज, रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या चहाच्या टपरीवर जाऊन स्वतःच्या हाताने चहा बनवला आणि पंढरपूरच्या वारीत आलेल्या भाविकांना गरमागरम चहा दिला. यावेळी दानवेंनी आपल्या मतदार संघातील सर्व भाविकांची विचारपूस करत त्यांच्या भेटीही घेतल्या. आपल्या जिल्ह्याचा खासदार स्वतःहा चहा वाटून विचारपूस करत असल्याने अनेक वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
राज्यभरातील वेगवेगळ्या दिंडीमधून पायी प्रवास करत हे वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. ऊन, पाऊस, लहरी हवामान यापैकी कशाचीही पर्वा न करता विठूरायाच्या भेटीसाठी हे वारकरी पंढरपुरात मोठ्या भक्तीभावानं दाखल झाले आहेत. 'याचसाठी केला होता अट्टहास... शेवटचा दिस गोड व्हावा' अशी या वारकऱ्यांची एकदाशीच्या दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेताना भावना असते. यंदा कोरोनाच्या विघ्नानंतर 2 वर्षांनी ही वारी पार पडली आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह होता. टाळ-मृदुंग, विणा, तुळशी वृंदावण घेऊन निघालेले वारकरी आता पंढरपुरात दाखल झाले आहेत. यावेळी रावसाहेब दानवेंसह, सुजय विखे पाटील, सुभाष देशमुख, प्रशांत परिचारक यांनी पंढरपुरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं. त्यांचा सत्कार मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी केला. सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.