आता ७ ते ८ वेळा भाजपला आणि एनडीए सरकारला सत्तेवर राहू द्या, असे म्हणत मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसने ७० वर्षात काय दिवे लावले हे जनतेमध्ये जाऊन सांगा. तसेच तुम्ही ७० वर्षात काही दिवे लावले नाही तर तुम्ही दिवे विझवण्याचं काम केलं. राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेवरून देखील मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर ठिकाणी यांनी आदिवासी एकता महामेळाव्यास उपस्थिती लावली. यावेळी या कार्यक्रमादरम्यान काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवरून राहुल गांधी यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. सत्तर वर्ष सत्तेत असताना तुम्ही भारत जोडला नाही का त्यामुळेच तुम्हाला आता भारत जोडो यात्रा करावी लागत आहे. सत्तर वर्षांमध्ये तुम्हाला भारत जोडता आला नाही. महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. आता काँग्रेस पुन्हा न्याय यात्रा काढणार आहे, अशा प्रकारच्या घोषणा करून चालणार नसल्याचं म्हणत रामदास आठवलेंनी काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला.
दरम्यान काँग्रेसने २७ डिसेंबर रोजी भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली होती. आपल्या दुसऱ्या यात्रेला काँग्रेसने ‘भारत न्याय यात्रा’असे नाव दिलंय. ही यात्रा १४ जानेवारी ते २० मार्चदरम्यान मणिपूर ते मुंबई अशी काढली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.