Ramdas Athawale 
महाराष्ट्र

Ramdas Athawale: संविधान धोक्यात नाहीतर त्यांचे पक्ष धोक्यात; रामदास आठवलेंची 'इंडिया' आघाडीवर टीका

Ramdas Athawale slams On India Alliance: भाजप पुन्हा सत्तेत आले तर मोदी सरकार संविधान बदलून टाकेल अशी शंका काँग्रेस इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. काँग्रेसच्या टीकेला भाजपकडून जोरदार उत्तर दिलं जात आहे. विरोधकाच्या या टीकेला रामदास आठवले यांनीही उत्तर दिलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजय दुधाणे

उल्हासनगर : विरोधी पक्ष बोलत आहे की, संविधान धोक्यात आहे. पण संविधान धोक्यात नसून त्यांचे पक्ष धोक्यात असल्याची टीका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी इंडिया आघाडीवर केलीय. दलित पॅथर कार्यकर्ते बाबुराव गोडबोले यांच्या कुटुंबीयांचे सात्वंन करण्यासाठी आठवले आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता.

राज्यातील लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा २० तारखेला पार पडणार आहे. राजकीय पक्षांकडून आपल्या उमेदवारांचा प्रचार जोरात केला जात आहे. 'इंडिया' आघाडीकडून भाजपवर घणाघाती टीका केली जात आहे. 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांकडून भाजप आणि मोदींवर चहुबाजूंनी हल्लाबोल केला जात आहे. आरक्षण, हिंदू-मुस्लीम, रोजगार,आदी प्रश्नांवर इंडिया आघाडी भाजपला लक्ष्य केलं जात आहे.

भाजप पुन्हा सत्तेत आले तर मोदी सरकार संविधान बदलून टाकेल, अशी शंका काँग्रेस इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. काँग्रेसच्या टीकेला भाजपकडून जोरदार उत्तर दिलं जात आहे. आता इंडिआ आघाडीच्या संविधान बदलाच्या आरोपाला रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी उत्तर दिलंय.

काही दिवसांपूर्वी उल्हासनगर मधील जुने दलित पॅथरचे कार्यकर्ते बाबुराव गोडबोले यांचे निधन झाले होते. गोडबोले यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी रामदास आठवले आज उल्हासनगरात आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना आठवलेंनी इंडिया आघाडीला टोला मारला. महायुती देशात ४०० आणि राज्यात ४० लोकसभेच्या जागा जिंकणार, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला होता.

यासह आठवलेंनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली. प्रकाश आंबेडकर यांनी उल्हासनगरमध्ये भाजपा विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्तर देताना आठवले म्हणाले, भाजप झोपणार नाही, तर भाजप दुसऱ्यांना झोपवण्यासाठी मैदानात उतरलीय. बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी आहे, रिपब्लिकन पार्टी त्यांच्यासोबत असल्याचं आठवले म्हणाले. तसेच विरोधी पक्षाकडून संविधान बदल केली जाण्याच्या टीकेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, संविधान धोक्यात नसून त्यांचे पक्ष धोक्यात आहे महाविकास आघाडी धोक्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सोलापूरकरांनी कोणाला दिला कौल? विजयाची वैशिष्ट्ये काय?

Sujay Vikhe Patil : जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा कार्यक्रम लावला; संगमनेरमधील विजयानंतर सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

SCROLL FOR NEXT