Ramdas Athawale News Saam tv
महाराष्ट्र

Ramdas Athawale News: राम मंदिराच्या जागी आधी बुद्ध विहार होते; लोकार्पण सोहळ्याआधीच रामदास आठवलेंचा मोठा दावा

Ramdas Athawale on ayodhya: अयोध्येतील राम मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या मंदिराचं २२ जानेवारीला लोकार्पण होणार आहे. या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मंदिर कमिटीने जय्यत सुरु केली आहे.

Vishal Gangurde

मनोज जैस्वाल, वाशिम

Ramdas Athawale Latest News:

अयोध्येतील राम मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या मंदिराचं २२ जानेवारीला लोकार्पण होणार आहे. या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मंदिर कमिटीने जय्यत सुरु केली आहे. या लोकार्पण सोहळ्याआधीच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'राम मंदिराच्या जागी आधी बुद्ध विहार होते, असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रामदास आठवले यांनी राम मंदिर ते प्रकाश आंबेडकर अशा सर्वच मुद्द्यांवर भाष्य केलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रामदास आठवले म्हणाले, 'सध्या बांधण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या जागेवर यापूर्वी बौद्ध मंदिर होते. त्यामुळे बाबरी मशिदीप्रमाणेच तिथे बुद्ध मंदिर व्हावे, यासाठी ही प्रयत्न करणार आहे.

राम मंदिराच्या निमंत्रणावर आठवले काय म्हणाले?

'राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपल्यालाही निमंत्रण असून मी देखील कार्यक्रमाला जाणार आहे. मुस्लिम समाजानेही राम मंदिराच्या बाबतीतला निर्णय शांततेने स्वीकारलेला आहे. मात्र काँग्रेसने या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. तसाच सर्व हिंदू समाजाने सुद्धा येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसवर बहिष्कार टाकावा ,असेही वक्तव्य रामदास आठवले यांनी केले

'अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली'

वाशिममध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना अकोल्याची जागा तुम्ही मागणार का, असा पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ही जागा आम्ही प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली, असं मोठं वक्तव्य केल आहे. प्रकाश आंबेडकरांना तुमचा पाठिंबा आहे का? असं विचारलं असता. त्यांनी आम्हाला पाठिंबा दिल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.

'प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिलेला बारा-बारा जागांचा फॉर्म्युला आघाडीने स्वीकारावा. त्यानंतर त्यांचे बारा वाजवण्यात आम्हाला यश येईल, असा टोलाही रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cooking Tips : जेवणात जास्त गरम मसाला गेल्यास काय करावे?

बेळगावात मराठी कुटुंबानं उचललं टोकाचं पाऊल; विष प्राशन करून तिघांनी आयुष्य संपवलं, एकीची प्रकृती गंभीर | Belgaum

Ambernath : लिफ्टमध्ये एकटा दिसला, बिल्डिंगमधील व्यक्तीचा 12 वर्षीय मुलावर हल्ला; हातालाही चावला, अंबरनाथमध्ये खळबळ VIDEO

'लवकरच घरी आलो जेवायला'; आईला शेवटचा फोन, J.J हॉस्पिटलच्या डॉक्टरची अटल सेतूवरुन समुद्रात उडी

Wainganga Flood : वैनगंगेला मोठा पुर; ब्रह्मपुरी तालुक्यातील ८ गावांना पाण्याचा वेढा, अनेक कुटुंबाना हलविले सुरक्षितस्थळी

SCROLL FOR NEXT