Union Minister Bharati Pawar  Saam TV
महाराष्ट्र

Nanded Hospital : नांदेडच्या रुग्णालयातील रुग्णांचा 'या' कारणामुळे झाला मृत्यू; मंत्री भारती पवारांनी दिली महत्त्वाची अपडेट

Union Minister Bharati Pawar : नांदेडमधील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मृत्यूंचा प्राथमिक अहवाल केंद्र सरकारला प्राप्त झालाय.

Bharat Jadhav

Bharat Pawar on Nanded Hospital Deaths case:

नांदेडमधील विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या मृत्यू तांडवामुळे राज्यात खळबळ माजलीय. गेल्यी तीन दिवसात या रुग्णालयातील ३७ रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यात अजून १४ जणांचा मृत्यू झाल्यानं ४ दिवसात मृतांचा आकडा ५० वर पोहोचलाय. दरम्यान हे मृत्यू का होत आहेत. याविषयीची माहिती केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. (Latest News)

नांदेडमधील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मृत्यूंचा प्राथमिक अहवाल केंद्र सरकारला प्राप्त झालाय. या अहवालानुसार हे सर्व मृत्यू औषधांअभावी झालेले नाहीत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिलीय. पवार म्हणाल्या, सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर तेथे वैद्यकीय सुविधा मिळतात की नाही, याची परिस्थिती जाणून घेतली. ५०० बेडचे हॉस्पिटल आहे. तेथे औषधे आहेत की नाही याबाबत माहिती घेतली.

इमर्जन्सी रुग्ण किती आहेत याचा आढावा घेतला, त्यानुसार आज २५ रुग्ण आहेत काल ४० होते. येथे आयसीयूचे ९ बेड होते, ते वाढवण्याची गरज होती. त्यानुसार कोरोनात या रुग्णालयाला पॅकेज देण्यात आलं होतं. त्यानंतर ते आता ८० बेडचं होईल. परंतु काही टेक्निकल अडचणी असल्याचं त्या म्हणाल्या. या संपूर्ण प्रकरणासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ३ ऑक्टोबर रोजी ही समिती नेमलीय. त्यानुसार ही चौकशी सुरूय

ही नवजात बाळं या रुग्णालयात होते ते इमर्जन्सी व्हेंटिलेटरवर असतानाच त्यांना शिफ्ट करण्यात आलं होतं. समिती संपूर्ण अहवाल देईलच पण प्राथमिक अहवालानुसार, त्यामध्ये विशेषकरुन पुरेसी औषधं उपलब्ध होती, असंही भारती पवार यांनी सांगितलं. दरम्यान नांदेडमधील शासकीय रुग्णालयात झालेल्या या मृत्यू तांडवाचं कारण अपुरा औषध साठा, कमी मनुष्यबळ, आदी कारणं असल्याचं म्हटलं जातं.

विरोधकांनी या घटनेवरून राज्य सरकारला धारेवर धरलंय. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातून डॉक्टरांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT