Nitin Gadkari  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: जातीचे सेल उघडू नका, ती मोठी चूकच, गडकरींचा बावनकुळेंना परखड सल्ला

Nitin Gadkari caste cell statement : नागपूरमध्ये भाजपच्या स्थापना दिनी नितीन गडकरींनी बावनकुळे यांना जाती सेल उघडण्याच्या निर्णयावर परखड सल्ला दिला. हा मोठा अपयशी प्रयोग असून पुन्हा करू नये, असं गडकरी म्हणाले.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Nitin Gadkari Warns Bawankule: जातीचे सेल उघडणे ही मोठी चूक आहे, मी ज्या चुका केल्या त्या बावनकुळे यांनी करू नये, असं परखड मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते नागपूरमध्ये भाजपच्या स्थापना दिवस कार्यक्रमात बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना परखड सल्ला दिला. पक्षात जातीचे सेल उघडणे ही मोठी चूक आहे, असे प्रयोग चंद्रशेखर बावनकुळे यांनी करू नयेत, असे गडकरी म्हणाले. नागपुरातील मुंडले स्कूल येथे ४४ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या भाजपने संघर्षातून आज देशातील सर्वव्यापी राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवली आहे. या वाटचालीत पक्षाला जातीवादापासून दूर ठेवण्याचे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, नेते म्हणतात माझ्यानंतर माझ्या मुलाला तिकीट द्या. पण मुलावर जेवढे प्रेम करतो, तेवढे कार्यकर्त्यावर करा. गुण-दोषांसह परिवारासारखे प्रेम ठेवा. नवीन इमारत उत्तम होईल, पण माणूसपण कायम राहील पाहिजे. हा पक्ष पारिवारिक नाही, तर लोकांचा पक्ष आहे.

गडकरी म्हणाले, "मी प्रदेशाध्यक्ष असताना सर्व जातींना पक्षाशी जोडण्यासाठी जातींचे सेल स्थापन केले होते. पण जाती जुळल्याच नाहीत आणि तो निर्णय चूक ठरला. भाजपचा कार्यकर्ता हीच आपली खरी जात आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे." जातीचे सेल उघडल्याने काहीच साध्य होत नाही. उलट ५० लोक तिकीट मागायला येतील, तेव्हा त्यांना ही चूक कळेल, असे गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितले. यावेळी गडकरींनी काँग्रेसवरही टीका केली. प्रतिकूल काळात काँग्रेसने भाजप आणि संघाला जातीवादी ठरवून समाजात चुकीची प्रतिमा निर्माण केली. मात्र, आपला पक्ष जातीवादी नाही, असे गडकरी म्हणाले.

१९५२ ते १९७५ हा जनसंघाचा काळ होता. १९७५ नंतर आणीबाणीत मी युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो, नंतर जनरल सेक्रेटरी झालो. संघर्षातून पक्ष वाढला. हे कार्यालय आपले घर आहे. इथे जुन्या स्मृती जपायच्या आहेत, अस गडकरी म्हणाले. मला आणि देवेंद्र फडणवीस यांना ही संधी असंख्य कार्यकर्त्यांच्या त्यागामुळे मिळाली,असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: जगातले सर्वाच पहिले धान्य कोणते? जाणून घ्या रोचक माहिती

Lalbaug Visarjan 2025 : लालबाग राजाच्या विसर्जनाला विघ्न, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

Heart-Touching Video : बाप्पाला घरी घेऊन चला, पाण्यात सोडू नका, शिवण्याचा बाबाकडे हट्ट, व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Maharashtra Live News Update: पुणे पोलिस गणपती मंडळांपुढे हतबल

Lalit Prabhakar : 'आरपार'नंतर ललित प्रभाकर हिंदी चित्रपटात झळकणार, सिनेमाचे नाव काय?

SCROLL FOR NEXT