Nitin Gadkari Latest Speech Saam Tv
महाराष्ट्र

Nitin Gadkari : 'मी आमदार असताना...'; नितीन गडकरींना सांगितला मॉइल हॉस्पिटलचा 'तो' जुना किस्सा

Vishal Gangurde

पराग ढोबळे, नागपूर

Nitin Gadkari News :

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील शासकीय मेयो रुग्णालयाच्या नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा आणि इतर विकासकामांचे लोकार्पणाला हजेरी लावली. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते नागपुरातील मेयो रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होते. (Latest Marathi News)

केंद्रीय नितीन गडकरी यांच्या भाषणातील मुद्दे

१. मेयो रुग्णालयासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मोठा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी खूप निधी आणला. पण काहीच काम व्यवस्थित होत नाही. मशीन मिळाली तर ऑपरेटर नसतो. ऑपरेटर असला तर मशीन नसते. दोन्ही असले की वीज नसते.

२. मेयो रुग्णालयाला यापुढे निधी मिळेल, पण जागा मिळणार नाही. या रुग्णालयाच्या मागच्या बाजूला असलेलं अतिक्रमण जिल्हाधिकाऱ्यांनी काढून टाकावे. पुण्यात रुबी हॉस्पिटलला मेट्रोची कनेक्टिव्हिटी मिळाली असल्याने सर्वांना सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

३. नागपुरातही मेट्रोचा विस्तार होत आहे. मेयो रुग्णालयाला देखील मेट्रो स्टेशनने जोडून द्यावे.

मेडिकलच्या विद्यार्थांसाठी चांगले हॉस्टेल तयार केले पाहिजे. तसेच नागपूरचा उन्हाळा पाहता हॉस्पिटल पूर्ण एअर कंडिशन असायला पाहिजे.

४. मी आमदार असताना एक व्यावसायिकाला विनंती करून मॉइलच्या हॉस्पिटलमध्ये चार कुलरची व्यवस्था केली. मात्र त्यावर आक्षेप घेण्यात आला. कुलर तर दान केले...मात्र वीज जळाली त्याचं काय? असे अनेकजण आक्षेप घेणारे सरकारमध्ये आहेत.

५. गरिबांसाठी वैद्यकीय सुविधा घेणे खूप महाग झाले आहे. खासगी रुग्णालयात दर खूप असतात. त्यामुळे अनेक रुग्ण मृत्यू स्वीकारतात. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी आयुष्यमान योजना आणली आहे. राज्य सरकारची महात्मा फुले योजना आहे.

६. मी येथे आल्यावर पूर्ण इमारत पाहिली आणि चुका काढल्या. त्याबाबत कंत्राटदारालाही सांगितले. येथील चांगल्या कामाचा फायदा येथे शिकणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि रुग्णांना होईल असेही गडकरी म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर केडीएमसीला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याचा केडीएमसी अधिकाऱ्याला तंबी

Kalyan Crime : डिलिव्हरी बॉय, पण काम भयंकर, व्हिडिओ बघून सर्वच हैराण; CCTV पाहा

SCROLL FOR NEXT