Amit Shah Pune News saam tv
महाराष्ट्र

Amit Shah Maharashtra Visit: अमित शहा एकाच महिन्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर, मुख्यमंत्री शिंदे स्वागताला जाणार

Amit Shah News: या दौऱ्यानंतर येत्या काळात काही नवीन राजकीय घडामोडी घडणार का याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

Amit Shah Nagpur Visit: राज्यात राजकीय उलथापालथ सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या भूमिकांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवस नागपूर दौऱ्यावर येणार आहे. (Latest Marathi news)

दोन आठवड्यांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शहांचा एप्रिल महिन्यांतील हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर येत असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. 

एकाच महिन्यात अमित शहा दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. गुरुवारी जामठा इथल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे. मंगळवारी पोलीस (Police) आयुक्तांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.

आज रात्री अमित शहा यांचे नागपूरात (Nagpur) आगमन होणार आहे. पक्षीय बैठकाही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेसुद्धा रात्री नागपूरमध्ये अमित शहा यांच्या भेटीसाठी येणार आहेत. अमित शहांच्या स्वागतासाठी एकनाथ शिंदे नागपूर विमानतळावर उपस्थित राहणार आहेत. (Maharashtra News)

अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदेंसोबत त्यांच्या जवळीकतेची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अमित शाहांच्या या दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून या दौऱ्यानंतर येत्या काळात काही नवीन राजकीय घडामोडी घडणार का याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup Trophy Controversy: आशिया कपची ट्रॉफी घेऊन जाणाऱ्या नक्वीला मोठी कारवाई होणार; बीसीसीआयचा इशारा

KDMC : दिवाळीच्या दिवशी कंत्राटी कामगारांचं ठिय्या आंदोलन; बोनस न मिळाल्याने संताप व्यक्त

Vastu Tips Of Broom: झाडूविषयी हे नियम तुम्हाला माहित आहे का?

Maharashtra Live News Update : यवतमाळमध्ये परतीच्या पावसाने झोडपलं

Lakshmi Pujan 2025: लक्ष्मीपूजनाच्या रात्री मीठाचा हा उपाय जरूर करा, घरात नांदेल सुख- शांती

SCROLL FOR NEXT