Amit Shah Devendra Fadanvis Saamtv
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा फडणवीसांना फोन; काय झाली चर्चा?

Amit Shah: अमित शहा यांनी राज्यातील परिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याचे समोर आले आहे.

Gangappa Pujari

Maratha Reservation Protest:

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचे दिसत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. कालपासून या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले असून जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्यात. या आंदोलनांची केंद्रीय गृह विभागानेही दखल घेतली असून गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील परिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यात आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा बांधव रस्त्यावर उतरले आहे. ठिकाठिकाणी विविध मार्गांनी मराठा समाजाचं आंदोलन सुरु केले असून गावागावात राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.  कालपासून या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले.

राज्यातअनेक ठिकाणी नेत्यांच्या घरांची जाळपोळ, तसेच दगडफेकीच्या घटनाही समोर आल्या आहेत. या आंदोलनामुळे अनेक शहरांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या संपूर्ण घटनांची केंद्रीय गृह मंत्रालयानेही गंभीर दखल घेतली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या चर्चेत त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, याबाबत बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही लोक आंदोलनाचा फायदा घेऊन हिंसा घडवण्याचा प्रकार करत आहेत, असा गंभीर आरोप केला आहे. तसेच लोकप्रतिनिधींना टार्गेट केले जात आहे, लूटीच्या घटना होत आहेत याची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

SCROLL FOR NEXT