Onion Export Ban Effect Saam Digital
महाराष्ट्र

Onion Export Ban Effect: निर्यातबंदीनंतर कांद्याच्या दरात मोठी घसरण, नाफेड, NCCF कडून खरेदीच्या नावावर शेतकऱ्यांची दिशाभूल होतेय का? काय आहे शेतकऱ्यांच म्हणणं

Onion Export Ban Effect: नाफेड आणि NCCF कडून नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदीला सुरुवात केल्याच्या मोठमोठ्या जाहिराती लावण्यात आल्या आहेत नाफेडकडून नाशिक जिल्ह्यात १३ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू केल्याचा दावा करण्यात आला आहे.

Sandeep Gawade

Onion Export Ban Effect

मागील आठवड्यात केंद्रानं लागू केलेल्या निर्यातबंदीमुळे कांदा दरात १५०० ते २००० हजारांची घसरण कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे नाफेड आणि NCCF कडून नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदीला सुरुवात केल्याच्या मोठमोठ्या जाहिराती लावण्यात आल्या आहेत नाफेडकडून नाशिक जिल्ह्यात १३ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू केल्याचा दावा करण्यात आला आहे.

मात्र प्रत्यक्षात नाफेड आणि NCCF कडून नेमक्या कोणत्या ठिकाणी, कोणत्या केंद्रांवर खरेदी सुरू आहे, याची शेतकऱ्यांना माहिती दिलेली नाही. त्यामुळे नाफेड आणि NCCF कडून शेतकऱ्यांची पुन्हा दिशाभूल? करत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केला आहे. तसेच आधी खरेदी केलेल्या कांद्याचं नेमकं काय केलं? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला असल्यामुळे कांदा पडून आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण पहायला मिळत आहे. परिणामी कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. १२०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल प्रर्यंत दर खाली आले आहे. दरम्यान नाशिकच्या नांदगावमध्ये शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. ५०० रुपयांपासून बोली सुरू असल्याने शेतकरी आक्रमक झाले. यानंतर नांदगाव बाजार समिती कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT