गोळ्या झाडून करण्यात आलेल्या हत्याकांडाचा उलगडा; ३ आरोपी अटक गजानन भोयर
महाराष्ट्र

गोळ्या झाडून करण्यात आलेल्या हत्याकांडाचा उलगडा; ३ आरोपी अटक

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांघरी कुटे परिसरात 12 सप्टेंबरला बंदुकीच्या गोळ्या झाडून, एका इसमाची हत्या

गजानन भोयर, साम टीव्ही वाशिम

वाशिम : वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांघरी कुटे परिसरात 12 सप्टेंबरला बंदुकीच्या गोळ्या झाडून, एका इसमाची हत्या करून, नग्न अवस्थेत शेतात फेकले होते. हत्येची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी मृत व्यक्तीचे ओळख पटविल्यानंतर मयत माधव पवार नागपूरचा असल्याचं निष्पन्न झाले आहे.

हे देखील पहा-

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी तपासाचे चक्रे फिरवीत शुभम कान्हारकर, विकल्प मोहोड, व्यंकटेश भगत या सर्वाना नागपूर या ठिकाणी अटक करण्यात आली आहे. सदर हत्याकांड आर्थिक व्यवहाराच्या वादातून घडल्याचे, दिसून येत आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव करत आहेत.

नागपुरातून अपहरण करून मालेगाव तालुक्यातील पांघरी कुटे शेतशिवारात गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेला माधव पवार आणि आरोपी निशीद वासनिक यांचा नागपूर या ठिकाणी बिट कॉईन चा व्यवसाय होता. यामध्ये निशीद वासनिक वर नागपूर मध्ये विविध प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारात वाद निर्माण झाला असून, मयत माधव पवार यांच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये सर्व व्यवहाराची माहिती असल्याने त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिली आहे. ३ पुरुष आरोपी आणि १ महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर यामध्ये अजून ३ आरोपी फरार असून, याचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान लवकरच त्यांचा शोध घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gen-z Trend: अफोर्डेटिंग जेन झीचा नवा डेटिंग ट्रेंड नक्की काय आहे?

Homemade Face Wash : एकही पैसा खर्च न करता घरीच बनवा फेसवॉश, तुमचा चेहरा आरशासारखा चमकेल

Pune Rada : पुण्यात भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार राडा, आंदोलनावेळी दगडफेक | Video

Kolhapur : २५ जणांच्या टोळक्यानं JCB घरावर फिरवला, दिवसाढवळ्या १३ तोळे सोन्यावर डल्ला, कोल्हापूर हादरले

Viral Video: पहिल्यांदा Kiss, मग Ice Cream! मुलगी आणि हत्तीच्या पिल्लाच्या क्युट बॉन्डचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT