महाराष्ट्र

Mharashtra Wather: अवकाळी पाऊस जीवावर बेतला; २४ तासांत वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Heavy Rain : अशात या अवकाळी पावसामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू देखील झालाय.

Ruchika Jadhav

Heavy Rain : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी मोठी गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास दूर गेला आहे. अशात या अवकाळी पावसामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू देखील झालाय. हिंगोली आणि परभणी शहरांध्ये ही दु:खद घटना घडली आहे. (Mharashtra Wather)

मांडेवडगावात वीज कोसळून महिलेचा मृत्यू

मानवत तालुक्यातील मांडेवडगाव या ठिकाणी आज सकाळी दहा वाजता प्रचंड विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यावेळी एका 60 वर्षीय वृद्ध महिलेच्या अंगावर वीज पडल्यामुळे त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

ज्येष्ठ नागरिक इंदुमती नारायण होंडे या सकाळी शेतामध्ये कापूस वेचणी करत होत्या. त्यावेळी अचानक आभाळ भरून आले. विजांचा कडकडाट सुरु झाला. त्याचवेळी दुर्दैवाने त्यांच्या अंगावर वीज कोसळली. ग्रामस्थांनी धावपळ करत इंदुमती यांना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती या त्यांना मृत घोषित केले आहे.

हिंगोलीध्ये आणखी एकाचा मृत्यू

आज संपूर्ण दिवभरात अवकाळी पावसामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची दुसरी घटना ही हिंगोली येथे घडली आहे. पिराजी चव्हाण असं अंगावर वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पिराजी आपल्या शेतामध्ये हळद काढण्याचे काम करत होते. सोसाट्याचा वादळवारा सुटून अचानक पाऊस आल्याने त्यांना तेथून पटकन पळता आले नाही. तितक्यात त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि होरपळून त्यांचा मृत्यू झाला.

राज्यात अवकाळी पावसामुळे दोन व्यक्तींचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला आहे. कडक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वीजांच्या कडकडाटासह पाऊस येत असल्याने शेती पिकाचे यात मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

SCROLL FOR NEXT