शेतीच्या वादातून पुतण्याचा काकावर कुऱ्हाडीने हल्ला Saam Tv
महाराष्ट्र

शेतीच्या वादातून पुतण्याचा काकावर कुऱ्हाडीने हल्ला

दरम्यान या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात पुतण्या कृष्णा आणि केशव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे

बीडच्या पिंपळवाडी (Beed) येथील वृद्ध शेतकर्‍याला, शेतीच्या वादातून कुर्‍हाडीने मारहाण करत दोघांनी गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शेतकर्‍याच्या फिर्यादीवरून पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगन्नाथ एकनाथ बहिरवाळ वय 70 रा. पिंपळवाडी असं जखमी शेतकऱ्याचं नाव आहे.

वृद्ध शेतकरी जगनाथ बहिरवाळ यांनी शेतीतील ऊस जनावरांना टाकला होता. मात्र हा ऊस तू जनावरांना का टाकलास तू ऊस तोडू नको. असं म्हणत पुतण्या कृष्णा कान्हू बहिरवाळ आणि केशव यांनी वृद्ध जगनाथ बहिरवाळ यांना, कुर्‍हाड, दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केलं आहे. यामध्ये वृद्ध शेतकर्‍याच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात पुतण्या कृष्णा आणि केशव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस शेतीचे वाद विकोपाला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कुठं बांधाच्या वादातून वाद तर कुठं शेतीच्या वादातून खून होत आहेत. मात्र या सर्व प्रकारावर आळा बसावा. यासाठी जिल्हा प्रशासनाने, पोलिस प्रशासनाकडून अद्यापही कोणत्याच ठोस उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे अशा घटना वारंवार घडत असून यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचं समोर येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमधील वाद मिटवण्याचा उद्देशाने, जिल्हा प्रशासनाने गावागावात प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्यात यावेत. अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT