Ulhasnagar News Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar News : कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलांनी कपड्यांची केली चोरी; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Ulhasnagar News : उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील मेन बाजारमध्ये असलेल्या द लेबल नावाच्या दुकानात तीन महिला कपडे खरेदीच्या बहाण्याने आल्या.

अजय दुधाणे

उल्हासनगर : चोरीच्या घटनांमध्ये महिलांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हातचलाखी करून दुकानातून (Theft) चोरी करण्याच्या घटना मागील काही दिवसात वाढल्या आहेत. याच प्रमाणे उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) कपड्याच्या दुकानात खरेदीसाठी गेलेल्या महिलांनी कपडे चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. (Tajya Batmya)

उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील मेन बाजारमध्ये असलेल्या द लेबल नावाच्या दुकानात तीन महिला कपडे खरेदीच्या बहाण्याने आल्या. या दरम्यान त्यांनी दुकानातील कामगारांकडून कपडे पसंतीसाठी मागविले. त्यांनी कपडे पहिले. याच दरम्यान कर्मचाऱ्यांची नजर चुकवून तिघा महिलांनी दुकानातून १२ हजार रुपयांचा माल (Crime News) चोरून नेला. दरम्यान कपडे गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर दुकानधारकाने सीसीटीव्ही (CCTV) तपासले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्या महिलांचा शोध सुरु 

ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कपडे चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. विठ्ठलवाडी पोलिस सीसीटीव्ही च्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकरांचा वीज अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT