Ulhasnagar News Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar News : रेकोर्डवरील गुन्हेगाराला शस्त्रांसह केले जेरबंद; उल्हासनगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Ulhasnagar News : पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी भगवती सबाजीत यादव हा जेवणासाठी नेवाळी नाका परिसरातील हॉटेल साई पॅलेस येथे आला होता

अजय दुधाणे

उल्हासनगर : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची गस्त वाढलेली असताना उल्हासनगरच्या गुन्हा शाखेने एका सराईत गुन्हेराला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून एक देशी पिस्तुलसह दोन जिवंत राउंड तसेच ३१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केलं आहे

पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी भगवती सबाजीत यादव हा जेवणासाठी नेवाळी नाका परिसरातील हॉटेल साई पॅलेस येथे आला होता. त्याच्याजवळ पिस्तुल असल्याची गुप्त माहिती (Ulhasnagar News) उल्हासनगर गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीसांनी घटनास्थळी जात त्याची झाडाझडती घेतली असताना आरोपीकडे एक देशी पिस्तुलसह दोन जिवंत राउंड त्याचबरोबर सुमारे 31 हजारांची रोकड आढळून आली.  

दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयित भगवती यादव याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला असून त्याला अटक केली आहे. या आरोपीविरोधात बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात यापूर्वी ही गुन्हा दाखल आहे. भगवती यादव हा चोवीस वर्षाचा असून तो बदलापूर पूर्व कात्रप परिसरात राहणारा आहे. यासंदर्भात हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमच्या ऑनलाईन शॉपिंगवर ITची नजर? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

मराठी-हिंदी संघर्ष, मुस्लीम ठरणार किंगमेकर? मुंबईची निवडणूक पुन्हा भाषा आणि प्रांतावर

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

SCROLL FOR NEXT