Ulhasnagar News Saam tv
महाराष्ट्र

Ulhasnagar News : मंदिराबाहेर सापडलं स्त्री जातीचं अर्भक; उल्हासनगरातील धक्कादायक प्रकार

Ulhasnagar News : उल्हासनगरच्या कॅम्प चार परिसरातील स्टेशनलगत असलेल्या अंबिका मंदिरात स्थानिक नागरिक पहाटेच्या सुमारास दर्शनासाठी येत असतात

अजय दुधाणे

उल्हासनगर : उल्हासनगरात मंदिराबाहेर एका गोणीमध्ये स्त्री जातीचं अर्भक सापडल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर या अर्भकाला स्थानिकांनी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं आहे. या अर्भकावर उपचार सुरु आहेत. 


उल्हासनगरच्या (Ulhasnagar) कॅम्प चार परिसरातील स्टेशनलगत असलेल्या अंबिका मंदिरात स्थानिक नागरिक पहाटेच्या सुमारास दर्शनासाठी येत असतात. नेहमीप्रमाणे काही नागरिक मंदिरात दर्शनासाठी आले असताना त्यांना पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास रडण्याचा आवाज आला. नागरिकांनी त्या दिशेने पहिले असता गोणीत काहीतरी पडल्याचे आढळून आले. त्यांनी गोणी उघडून पहिले असता त्यात हे अर्भक आढळून आले. 

त्यानंतर स्थानिक समाजसेवक राकेश माने आणि संदीप डोंगरे यांनी या अर्भकाला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं. तसेच याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पाहणी करत तपस सुरु केला आहे. रुग्णालयात दाखल हे बाळ सुदृढ असून ते मंदिराबाहेर कोणी ठेवलं? याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरील खर्चात मोठी कपात; सरकारचे किती पैसे वाचणार? समोर आले नवे आकडे

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये मुसळधार पावसाचा फटका; डहाणू–बोर्डी राज्य मार्ग 60 मीटर वाहून गेला, अनेक गावांचा संपर्क तुटला

कारल्यापासून बनवा कुरकुरीत भजी; चहा सोबत लागेल मस्त

Lower Back Pain: दिवसभर बसून काम करता? झोपण्याआधी १० मिनिटं करा 'हा' उपाय; पाठदुखीपासून मिळेल आराम

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा महामार्गावर भीषण अपघातात जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT