Dharavi News : झोपडी धारकांच्या पुनर्वसनास विरोध म्हणजे लक्ष्मी दर्शनाचा योग, शेलार यांचा असलम शेख यांच्यावर आरोप

Dharavi Mulad News : विधानसभा निवडणुकचा प्रचार सुरू झाला असून एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आता उमेदवारांकडून जडू लागले आहेत.
Dharavi News
Dharavi NewsSaam tv
Published On

संजय गडदे 
नवी मुंबई
: आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा अदाणी समूहाच्या माध्यमातून पुनर्विकास होत आहे. पुनर्विकास करत असताना अपात्र झोपडी धारकांचे पुनर्वसन बोरिवली, मालाड, दहिसर परिसरात केले जाणार आहे. मात्र याला काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार असलम शेख यांच्यासोबतच स्थानिकांकडून विरोध केला जात आहे. मात्र प्रकल्प पुढे जात असताना प्रकल्पाला असलम शेख यांच्याकडून विरोध करणे म्हणजे व्यवस्थित लक्ष्मी दर्शनाचा प्रकार घडेल. असलम शेख यांचा या विरोधा मागचे षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप मालाड विधानसभेचे भाजपाचे उमेदवार विनोद शेलार यांनी केला आहे. 
 

विधानसभा निवडणुकचा प्रचार सुरू झाला असून एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आता उमेदवारांकडून जडू लागले आहेत. यात मालाड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार असलम शेख यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून भाजपचे उमेदवार विनोद शेलार यांनी हरकत घेतल्यानंतर आता शेलार यांनी पुन्हा शेख यांना निशाणा बनवले आहे. शासनाकडून आदानी समूहाच्या माध्यमातून मुंबईच्या धारावी झोपडपट्टीचे पुनर्विकास करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पात अपात्र झोपडीधारकांना देखील भाडेतत्त्वावर घरे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी शासनाने मुंबईच्या मालाड, कांदिवली, दहिसर भागातील जागा देखील निश्चित केली आहे. मात्र मुलुंडकरांप्रमाणे मड मलाडवासीयांकडून देखील या धारावी पुनर्वसनातील विंस्थापितांच्या घराला विरोध होऊ लागला आहे. मालाडचे आमदार असलम शेख यांनी देखील स्थानिकांसोबत उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यावरून आता चांगलेच राजकारण पेटले असून असलम शेख यांच्या विरोधात उभे असलेले भाजप- शिवसेना महायुतीचे उमेदवार विनोद शेलार यांनी अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Dharavi News
Raigad News : रायगडात महाविकास आघाडीतील तिढा कायम; शिवसेने पाठोपाठ काँग्रेससमोर बंडखोरीचे आव्हान

माध्यमांशी संवाद साधताना विनोद शेलार म्हणाले, कि असलम शेख यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे एक व्यवस्थित षडयंत्र रचले असून ते सध्या मालाडकरांना भडकावत आहेत. भूमिपुत्रांची जागा जाणार अशा अफवा देखील पसरवत आहेत. मात्र सरकारने असा निर्णय घेतला, त्यावेळी असलम शेख यांनी याला विरोध का केला नाही? आपण या निर्णयाला विरोध केला होता का? कॅबिनेट मंत्री होता आपलं वजन देखील होतं मग हा विषय आपण कॅबिनेट पर्यंत का नेला नाही? असेही शेलार यांनी म्हटले आहे. हे सगळं घडत असताना आपण काय करत होता; असा सवाल असलम शेख यांना केला आहे. 

Dharavi News
Yavatmal Crime : फटाक्यांचा वाद जीवावर बेतला, भर रस्त्यात तरुणाची हत्या, घटना CCTV त कैद!

मात्र असलम शेख यांचा या प्रकल्पाला विरोध करण्यामागचं कारण म्हणजे हा प्रकल्प अदाणी समूहाच्या माध्यमातून राबवला जात आहे. त्यामुळे अदाणीशी काहीतरी चर्चा असलम शेख यांनी याविषयी केली आहे का? असा मला आता संशय येत आहे. त्यामुळे ते गप्प बसले आता प्रकल्प पुढच्या स्टेजला गेल्यानंतर लगेच अस्लम शेख यांनी यात उडी मारली. धारावीकरांचे पुनर्वसन इथे व्हायला नाही पाहिजे अशी भूमिका आता असलम शेख यांनी घेतली आहे. मात्र शेख हे फक्त मतांचे राजकारण करत आहेत. मुलुंडच्या आमदारांना मुलुंडकरांचे काळजी होती. म्हणून त्यांनी धारावीतील प्रकल्पातील विस्थापित झालेल्या अपात्र झोपडीधारकांच्या प्रकल्पाला त्यांनी विरोध केला. त्यामुळे तो प्रकल्प आता मड मालाड कांदिवली परिसरात येऊ घातला आहे. तुम्ही तर पालकमंत्री होतात तुमचं वजन भरपूर होतं मग का प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आपली ताकद का वापरली नाही असेही शेलार यांनी अस्लम शेख यांना म्हटले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com