Ulhasnagar Crime News Two best friends drowned in Ulhas river ssd92 Saam TV
महाराष्ट्र

Badlapur News: एकाला वाचवायला गेला अन् दुसराही बुडाला; उल्हास नदीत बुडून दोन जिवलग मित्रांचा दुर्देवी अंत

Badlapur News: बदलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हास नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला.

अजय दुधाने

Badlapur Marathi News: बदलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हास नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. क्षितिज शेजवळ (वय १७ वर्ष) आणि बाळकृष्ण (वय ३७ वर्ष) अशी मृत तरुणांची नावे आहेत. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.  (Breaking Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुण पोहण्यासाठी उल्हास नदीतपात्रात उतरले होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडू लागले. त्यामुळं त्यांना वाचवण्यासाठी एका इसमानं नदीत उडी मारली. (Latest Marathi News)

मात्र त्यालाही पाण्याचा अंदाज न आल्यानं तो सुद्धा बुडू लागला. यात आधी पोहायला गेलेल्या दोन तरुणांपैकी क्षितिज आणि त्याला वाचवायला गेलेला बाळकृष्ण या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. तर दोघांना वाचवण्यासा नदीत उडी घेतलेल्या तरुणाने कसाबसा आपला जीव वाचवला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या दोघांचे मृतदेह अग्निशमन दलानं बाहेर काढले असून याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. एकाचवेळी दोन जीवलग मित्रांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT