बॅनर लावून मोदींचे आभार माना युजीसीचे फर्मान !
बॅनर लावून मोदींचे आभार माना युजीसीचे फर्मान ! SaamTv
महाराष्ट्र

बॅनर लावून मोदींचे आभार माना युजीसीचे फर्मान !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) महाविद्यालये, सर्व विद्यापीठ व शिक्षण संस्थांना मोफत लसीकरणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार माना असे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशांचा शहरातील विद्यार्थी संघटनांकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोफत लसीकरणाबद्दल आभार माना व त्यासंबंधीचे बॅनर्स लावा असे युजीसी कडून सांगण्यात आले आहे. याबाबतचा अधिकृत मेल विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांना पाठवला आहे. UGC orders to Uniersities For Thanking Modi with banners

हे देखील पहा -

आभार मानण्यासाठी बॅनर्स आणि होर्डिगच्या डिझाइन्ससह हिंदी आणि इंग्रजी भाषेतील मजकूर देखील युजीसी कडून विद्यापीठांना University पाठवण्यात आला आहे. १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत Free लसीकरण vaccination २१ जूनपासून केंद्र सरकारने सुरु केले आहे. यासंदर्भात केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयामार्फत पाठवण्यात आलेल्या डिझाईननुसार बॅनर्स Banners, होर्डिंग्ज आणि पोस्टर्स Posters महाविद्यालये, विद्यापीठे आणि शिक्षण संथांमध्ये लावण्यात यावेत असे या निर्देशात नमूद करण्यात आले आहे.

या निर्णयासंदर्भात यूजीसीला पत्र लिहून स्टुडंट हेल्पिंग हँडस् संस्थेचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी विरोध दर्शविला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने कश्याच्या आधारावर अशी जाहिरातबाजी करण्यास सांगितले आहे ? असा सवाल त्यांनी या पत्रात विचारला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील इतर प्रश्नांकडे विद्यापीठ अनुदान आयोग गांभीर्याने पाहत नसून, महाविद्यालये Colleges ऑनलाईन Online पद्धतीने सुरु आहेत अश्या स्थितीत देखील विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क आकारण्यात येत आहे, या विरोधात देशभरातील विद्यार्थी भूमिका मांडत आहेत त्यांच्या प्रश्नांकडे युजीसी लक्ष्य देत नसून मोफत लसीकरणाबद्दल मोदीजींचे PM Narendra Modi आभार मानायला सांगताना युजीसीला लगेच जाग आली असा आरोप त्यांनी केला आहे.

देशभरातील विद्यार्थ्यांचे इतर प्रश्न प्रलंबित असून युजीसी त्यांच्याकडे गांभीर्याने न पाहता अश्या पद्धतीचे आभार मानावयास सांगत असेल तर मोठी शोकांतिका असल्याचे विद्यार्थी Students संघटनांचे Unions म्हणणे आहे.

यूजीसीने विद्यापीठे, महाविद्यालये यांना बॅनर्स लावण्याचे दिलेले आदेश म्हणजे आदेश लादण्याचा प्रकार असून निशुल्क लसीकरण ही सरकारची जबाबदारी आहे मग त्यासाठी बॅनर्स लावून पंतप्रधानांचे आभार का मानायचे. मोफत लसीकरण करून सरकार देशातील नागरिकांवर उपकार करत नाही. या जाहिरातबाजीसाठी Advertising विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांना कोरोना Corona काळात निधी खर्च करायला लावणे चुकीचे असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे यूजीसीने लक्ष्य देण्याची आवश्यकता असल्याचे युक्रांदचे पुणे शहर अध्यक्ष सचिन पांडुळे व उपाध्यक्ष कमलाकर शेटे यांनी म्हटले आहे.

By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Recipe: सोप्या पद्धतीचे इंडियन नुडल्स; चिमुकले होतील खुश

Mankhurd Shawrma News | शॉरमा खाल्ल्याने 19 वर्षीय तरूणाचा मृत्यू, दोघांना अटक

Western Railway: पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सेवा विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे लोकल उशिराने

Hair Care Tips: केसांमधील गुंता कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

Morning Excercise: सकाळी अर्धातास करा व्यायाम, ब्लड शुगर राहील नियंत्रणात

SCROLL FOR NEXT