Uddhav Thackeray Sabha In Pachora Jalgaon saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Jalgaon Sabha: जळगावात आज ठाकरी तोफ धडाडणार! सभेत गुलाबरावांचे मुखवटे घालून येऊ, शिवसेनेचा इशारा

Uddhav Thackeray News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जळगावच्या पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे.

अभिजीत सोनावणे

Uddhav Thackeray Sabha In Pachora Jalgaon: ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जळगावच्या पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर जळगावातील राजकारण तापलं असून ठाकरे गट आणि शिवसेनेकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. शिंदे गटाने ठाकरेंच्या सभेत गुलाबराव पाटील यांचे मुखवटे घालून प्रवेश करू असा इशारा दिला आहे.

दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या सभेपूर्वी मनसे देखील आक्रमक झाली आहे. खासदरा संजय राऊत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ मसैनिकांनी पाचोऱ्यात आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस देखील अलर्ट झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी पाचोऱ्यात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.

उद्धव ठाकरे यांचा पाचोरा दौरा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी ११.०० वाजता मुंबई येथून जळगावकडे खाजगी विमानाने प्रयाण करतील. दुपारी १२.०० वाजता ते जळगाव विमानतळ येथे दाखल होतील आणि येथून वाहनाने पाचोराकडे रवाना होतील. यानंतर दुपारी १.३० वाजता पाचोरा शहरात वरखेडी फाटा येथून महाराणा प्रताप चौकपर्यंत मोटरसायकल रॅली काढली जाईल आणि महाराणा प्रताप चौक येथे स्वागत केले जाईल. दुपारी २.०० वा. ते ४.३० पर्यंत निर्मल सिड्स रेस्ट हाऊस येथे जेवण आणि राखीव वेळ असेल. (Latest Political News)

दुपारी ४.३० वा. ते ५.३० ते निर्मल सिड्स समोरील नवीन इमारतीजवळ मोकळ्या जागी जळगाव जिल्ह्यातील उद्योजक यांच्याशी चर्चा करतील. तसेच निर्मल सिड्स येथील भारतातील प्रथम अत्याधुनिक नवीन तयार करण्यात आलेल्या लॅबचे उद्घाटन करतील. माजी आमदार आर ओ पाटील यांचा ११ फूट पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देखील ठाकरेंच्या हस्ते करण्यात येणार आहे. संध्याकाळी ६.३० वाजता ते सभेच्या ठिकाणी दाखल होतील. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : शेतकऱ्यांसाठी मोठी मदत, देवेंद्र फडणवीसांकडून मोठी घोषणा

Breaking News: शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी मदत, २५३ तालुक्यांना सरसकट नुकसान भरपाई; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Nashik Corporation : नाशिक महापालिकेसाठी ९ वर्ष जुन्या प्रभाग रचनेलाच मंजुरी; निवडणूक ठरणार चुरशीची, कोणत्या पक्षाला होणार फायदा?

Rohit sharma: आयतं कर्णधारपद कोणालाही मिळू नये! कॅप्टन्सी गेल्यानंतर रोहित शर्माचा जुना Video होतोय व्हायरल

Political News : ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; पक्षातील बड्या नेत्याने साथ सोडली

SCROLL FOR NEXT