Uddhav and Raj Thackeray share a rare moment together at Shivtirth during Ganpati darshan, fueling alliance talks in Maharashtra politics. Saam Tv
महाराष्ट्र

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Inside The Thackeray Brothers’ Meeting: उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरेंच्या घरी गेले.. या भेटीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंची भेट युतीची नांदी आहे का? ठाकरेंच्या भेटीचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार?

Suprim Maskar

ठाकरे बंधू गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा भेटले. यावेळची भेट होती शिवतीर्थावर...बाप्पाच्या दर्शनासाठी...राज ठाकरे यांच्या आमंत्रणानंतर उध्दव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर दाखल झाले..उद्धव ठाकरे जवळपास 2 तास राज ठाकरेंच्या घरी हजर होते. यावेळी ठाकरे बंधूंचं सहकुटुंब जेवणही झालं... त्यानंतर ठाकरे बंधूंमध्ये स्वतंत्र 10 मिनट बंद दाराआड चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात बंधुप्रेमाच्या युतीचा नव्यानं 'श्रीगणेशा' होणार का? अशी चर्चा रंगलीय.. दुसरीकडे या भेटीनंतर आगामी युतीबाबत ठाकरेसेनेनं राजकीय संकेत दिलेत.

चार महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. 5 जुलैला मराठी मेळाव्यातून दोन्ही भावांनी मराठीजनांसाठी एकत्र येण्याचे संकेतही दिले, त्यानंतर अनेक वर्षाच्या राजकीय मतभेदानंतर ठाकरे बंधूंमधील जवळीक दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. त्यामुळे या भेटीचा नेमका राजकीय अर्थ काय?

राज आणि उद्धव ठाकरेंचा 15 वर्षांपासूनचा

वैयक्तिक दुरावा कमी होतोय. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या युतीसाठी सकारात्मक वातावरण आहे. मतचोरीच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरेंनी विरोधकांच्या बाजूने उतरल्यानं राज्यात सत्ताधाऱ्यांविरोधात प्रादेशिक आघाडी उभी राहू शकते. दोन्ही ठाकरेंची ताकद एकत्र आल्यानं मुंबईत भाजपला ठाकरे बंधूचं मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे शिवतीर्थावर आल्यानंतर त्यांनी ठाकरेंच्या तीन पिढ्या एकत्र दिसतील, असा फोटो काढला तर राज ठाकरेंनी ही आपल्या मातोश्री भेटी दरम्यान बाळासाहेबांच्या प्रतिमेसोबत फोटो काढला. या फोटोंमधून कौटुंबिक नात्याबरोबरच ठाकरे ब्रँडही प्रस्थापित केला जातोय. एकूणच फोटोतली ही एकी प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिगणात ही तेवढीच उठून दिसणार का...हा महत्वाचा प्रश्न आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada Flood : मायबाप सरकार तुम्हीच सांगा कसं जगायचं? शेतकऱ्याचा आर्त सवाल

India vs Bangladesh: आशिया कपच्या अंतिम फेरीत भारताचा प्रवेश; अभिषेक शर्मा अन् कुलदीप समोर बांगलादेशनं नांगी टाकली

Maharashtra Flood: दर हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या; सरकार शेतकऱ्यांची मागणी मान्य करणार?

एसटी बँक नथुराम गोडसेची भक्त ? बँकेच्या वार्षिक अहवालावर झळकला फोटो

Mumbai Crime : मुंबईत दुहेरी हत्याकांड, निर्दयी मुलाकडून वडील आणि आजोबाची हत्या; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT