Uddhav Thackeray saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News: दर आठवड्याला एक माणूस फोडा, उद्धव ठाकरेंचे भाजप-शिंदे सरकरला टोमणे आणि सल्ले; वाचा काय म्हणाले?

Ruchika Jadhav

Maharashtra Political News: आगामी निवडणुकांच्या पार्शभूमिवर पक्षबांधनीसाठी आणि जनतेपर्यंत पोहचण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरेंचे सध्या राज्यभर दौरे सुरू आहेत. आज उद्धव ठाकरे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात दाखल होणार आहेत. अशात उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला ठाकरे गटातील दर आठवड्याला एक माणूस फोडा असा टोमणा लगावला आहे. (Latest Marathi News)

मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्तांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, २००७ साली असंच वातावरण होतं. यावेळी महापालिकेत जिंकणार की हारणार अशी परिस्थिती होती. मात्र सर्वांच्या साथीने तिथेही आपण जिंकलो. यावेळी आनंदाने काही महिलांना अश्रू आनावर झाले होते. या आश्रूंनी ज्यांना ज्यांना मोठं केलं त्यांना अजिर्न झालं आणि ते निघून गेले, अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली आहे.

आपल्याला गद्दारांना गाडायचं आहे. त्यामुळे मी शिंदे आणि भाजपला सांगतो की, दर आठवड्याला एक माणूस फोडा, असा टोमणा उद्धव ठाकरेंनी लगावलाय. तसेच पुढे ते म्हणाले की, जे कामाचे नाहीत ते जातील. त्यामुळे शिथिलता आलेले शिवसैनिक पेटून उठतील.

टोमण्यांसह उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला काही सल्ले देखील दिलेत. एकनाथ शिंदे यांनी आमदार फोडल्यानंतर देखील ठाकरे गटातील गळती सुरूच राहिली. ठाकरे गटाच्या अन्य काही पदाधिकाऱ्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला. त्यावर उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला सल्ला देत म्हटलं की, एक एक जण फोडण्यापेक्षा निवडणुका घ्या. पक्ष सोडून गेलेल्यांना माझा जय महाराष्ट्र.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who Is Satish Chavan: ऐन निवडणुकीत अजित पवार गटाने आमदाराला केलं निलंबित, कोण आहेत ते? वाचा...

Rajan Teli News : ठाकरेंचा भाजपला धक्का; मातोश्रीवर राजन तेली यांचा पक्ष प्रवेश

Mahayuti Meeting In Delhi : जागावाटपावर दिल्लीत अंतिम बैठक; मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीकडे रवाना

Sushma Andhare : विधानसभा निवडणूक लढवणार का? सुषमा अंधारे यांनी स्पष्टच सांगितलं

Nandurbar Accident : कोंडाईबारी घाटात अनर्थ घडला! बस-ट्रकचा भीषण अपघात; ८ जखमी, ३ प्रवासी गंभीर

SCROLL FOR NEXT