Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Speech : 'राज्यात एक फुल्ल दोन हाफ सरकार', उद्धव ठाकरेंचा भाजपसह राज्य सरकारवर हल्लाबोल

Political News : आमचे सरकार होते तर ते तीन चाकाचे सरकार होते. यांचे सरकार लगेच आता त्रिशूळ सरकार झालं, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

साम टिव्ही ब्युरो

Yavatmal News : उद्धव ठाकरे यांच्या दोन दिवसीय विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमध्ये कार्यकर्ते आणि नागरिकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपसह , पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिंदे-फडणवीस सरकारवरही जोरदार निशाणा साधला.

एक फुल्ल दोन हाफ

सध्याच्या राज्य सरकारमध्ये एक फुल्ल दोन हाफ अशी स्थिती आहे. आमचे सरकार होते तर ते तीन चाकाचे सरकार होते. यांचे सरकार लगेच आता त्रिशूळ सरकार झालं असल्याचं सांगतात. हे बेगडी सरकार चिरडून टाकण्यासाठी मी आलो आहे. तुम्ही लढणार असाल तर मी पुढे चालणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

माझ्यावर आरोप करतात घरी बसलो होतो. मात्र घरी बसून महाराष्ट्र चालवला. माझं नेतृत्व हे तुम्ही ठरवणार नाही, जनता ठरवेल. मी काँग्रेससोबत, पण तुम्ही मला तिथे ढकलले. तुम्ही मुफ्ती मेहबुबा सोबत गेले, मग मी काँग्रेससोबत गेलो तर काय झाले? असा सवालही उद्धव ठाकरे  यांनी उपस्थित केला.

संजय राठोडांवर निशाणा

उद्धव ठाकरे यांनी यावेळी मंत्री संजय राठोडांवरही निशाणा साधला. 200 रुपये हफ्ता घेणाऱ्याला मंत्री कुणी केलं. पण तो हफ्ते घेत होता हे मला माहित नव्हत, असा टोला उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांना लगावला.  (Political News)

तसेच भाजप आता बाजार बुणग्यांचा पक्ष झाला आहे. अनेक नेत्यांना मोठ्या कष्टाने भाजप वाढवला. मात्र आता निष्ठावंताची काय हालत होत आहे. भ्रष्टाचाराने माखलेल्या लोकांच्या सतरंज्या आता भाजपमधील निष्ठावंत अंधभक्त उचलत आहेत. 

बंडखोरांचा एकच मालिक

सर्व पक्षातील बंडखोरांचा एकच मालिक आहे. मत कुणालाही द्या, सरकार माझचं येणार, अशी भाजपची निती आहे. आता राष्ट्रवादी फोडायची काय गरज होती, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. मात्र चार दिवसातच राष्ट्रवादी फुटली आणि बंडखोर भाजपसोबत गेले. मोदी म्हणाले राष्ट्रवादी भ्रष्ट आता त्याच नेत्यांसोबत मोदींचा फोटो आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : महापालिकेआधी ठाकरेंच्या शिवसेनेला लॉटरी, एकाचवेळी ४०० जणांनी घेतली मशाल

Maharashtra Live News Update: नागपूरातील गोळीबार चौकात मोठी आग

Success Story : मुलासाठी आईने सरकारी नोकरी सोडली, चौथी फेल लेक झाला IRS अधिकारी, चौथ्या प्रयत्नात UPSC केली क्रॅक

Pune Police: आयुक्तांच्या नावाने एसीपींना दम; पोलीस आयुक्तांच्या PRO सहाय्यक पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन

Telangana Accident: महाराष्ट्रातील मजुरांचा तेलंगानामध्ये भयंकर अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू, ११ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT