Uddhav Thackeray News saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: ४०० पारचा नारा देऊन हुकूमशाही आणण्याचा डाव.. उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र; राणे- पिता पुत्रांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray Sabha Guhaghar: शिवसेना नेते भास्करराव जाधव, आनंद गीते यांच्यासह कोकणातले अन्य शिवसेनेचे नेते याकार्यक्रमास उपस्थित आहेत. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.

Gangappa Pujari

Uddhav Thackeray Speech:

आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज आज रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद दौरा होत आहे. शिवसेना नेते भास्करराव जाधव, आनंद गीते यांच्यासह कोकणातले अन्य शिवसेनेचे नेते याकार्यक्रमास उपस्थित आहेत. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"कोकण माझ्या हक्काचा आहे कोकण हा आपलाच आहे. कोकणाला विसरणारा मी नाही कोकणाचा आशीर्वाद घेऊनच मी महाराष्ट्रात फिरत आहे. शिवसेनाप्रमुख सुद्धा कोकण वासियांसमोर नतमस्तक झाले होते. त्यामुळे आपलं घट्ट नातं आहे. सध्या भाजपचे शीर्षासन सुरू आहे. या असभ्य आणि अस संस्कृत भाषेला भास्कर राव तुम्ही उत्तर द्यायला जाऊ नका," असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

"मला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. "बाकीच्या देशात पाहिलं तर त्या पक्षातील नेता पहिला मुख्यमंत्री होता. त्या परिस्थितीत मला मुख्यमंत्री पद स्वीकाराव लागलं होतं. म्हणून तुम्ही गद्दारी करून मला खाली खेचलं. मोदीजींची तीनपटं आहेत ते आम्हाला बेलगाम काहीही बोलत आहेत, असे म्हणत ठाकरेंनी राणे पिता पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला.

"अनेक नेते, कार्यकर्ते म्हणत आहेत उद्धवजी आपली लाट आहे आणि मोदी सरकारची वाट आहे असं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे. सध्या भाडोत्री जनता पार्टीने भ्रष्टाचारी अभय योजना सुरू केलेली आहे मोदींनी यांची गॅरंटी दिलेली आहे. चारसो पारनंतर देशाची घटना बदलतील, देशाची घटना बदलून हुकूमशाही आणण्याचा त्यांचा डाव आहे," असे आरोपही उद्धव ठाकरे यांनी केले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

SCROLL FOR NEXT