Uddhav Thackeray’s Sena Faces Major Defection in Konkan Saam TV Marathi News
महाराष्ट्र

Maharashtra politics : ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात पुन्हा खिंडार, शिंदेंच्या शिवसेनेत अनेकांचा प्रवेश

Sawantwadi Leaders Prakash Parsekar News : सावंतवाडीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रकाश पार्सेकरसह अनेक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे पक्षात प्रवेश करत राजकारण तापले. स्थानिक निवडणूक पार्श्वभूमीवर शिंदेंची ताकद वाढली आहे.

Namdeo Kumbhar

विनायक वंजारी, साम टीव्ही प्रतिनिधी

Uddhav Thackeray group loses key leaders in Konkan : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनातून आऊटगोईंग सुरूच आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंची अनेकांनी साथ सोडली. धक्कादायक म्हणजे, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातच ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. आता सावंतवाडी मतदार संघात पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडले आहे. प्रकाश पार्सेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर हा ठाकरेंना सावंतवाडीत मोठा धक्का मानला जातोय.

(Uddhav Thackeray’s Sena Faces Major Defection in Konkan)

शिवसेना ठाकरे गटाला सावंतवाडी मळेवाडमध्ये मोठं खिंडार पडलं आहे. मळेवाड सोसायटी चेअरमन प्रकाश पार्सेकर यांच्यासह युवा सेना उपजिल्हा प्रमुख, विभागप्रमुख, महिला उप तालुकाप्रमुख, ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला. आगामी जिल्हापरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मळेवाडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची ताकद यामुळे वाढली आहे. (Prakash Parsekar and other leaders join Shinde faction ahead of local elections )

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. सावंतवाडी तालुक्यातील मळेवाडमध्ये मोठं खिंडार त्यांनी पाडलं आहे. मळेवाड सोसायटी चेअरमन प्रकाश पार्सेकर, व्हा. चेअरमन प्रकाश राऊत, संचालक गोविंद मुळीक, गोपिका रेडकर, अर्जून तेली, धाकू शेळके, देऊ शिरसाट, रविंद्र तळवणेकर, दाजी पार्सेकर, दाजी गावडे, एकनाथ गावडे, दत्ताराम मुळीक, युवा सेना उपजिल्हा प्रमुख सतिश नाईक, विभागप्रमुख दाजी रेडकर, महिला उप तालुकाप्रमुख साधना कळंगुटकर, ग्रा. प. सदस्य अर्जून मुळीक आदींसह शेकडो कार्यकर्त्यानी जाहीर शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश झाला. यामध्ये यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, आता रोज प्रवेश होणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतवर भगवा फडकवायचा आहे‌. मी तुमच्या पाठीशी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कारच्या पुढील भागाचा चुरा, २ जणांचा जागीच मृत्यू

Local Body Election : स्थानिक निवडणुकीत आता 'साडी पॅटर्न'; अवघ्या महिलांची 40 रुपयावर मतदारांची बोळवण, VIDEO

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

BMC Election : महापालिकेची ही शेवटची निवडणूक, हातातून मुंबई गेली तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

SCROLL FOR NEXT