Uddhav Thackeray interacting with farmers during his second Marathwada tour saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: ठाकरेंचा मराठवाड्यातील दुसरा दौरा, उद्धव ठाकरेंनी साधलं 'टायमिंग'?

Uddhav Thackeray Marathwada Visit : उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यातील दुसरा दौरा पुन्हा एकदा चर्चेत आलाय.. या दौऱ्यातून सरकारची नाकेबंदी करत. उद्धव ठाकरेंनी थेट कर्जमाफीसाठी नवी खेळी खेळली आहे. त्यांनी शेतकऱ्यांना नेमकं काय करायला सांगितलं? यामुळे सरकारची काय डोकेदुखी वाढणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Snehil Shivaji

  • पहिल्या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी नुकसान भरपाईवरून सरकारला घेरलं होतं.

  • शेतकऱ्यांना थेट गावागावात कर्जमाफी नाही तर मत नाही असे बॅनर लावा.

  • मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना याचा फायदा होणार का

राज्यात अतिवृष्टीनं बेहाल झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महिन्याभरातच दुसऱ्यांदा पोहचले आहेत.मात्र मराठवाड्यातल्या या दुसऱ्या दौऱ्यात ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासोबतच आपला मोर्चा कर्जमाफीकडे वळवल्याचं दिसतंय. ठाकरेंनी शेतकऱ्यांना थेट गावागावात कर्जमाफी नाही तर मत नाही असे बॅनरच लावण्याचं आवाहन केल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा आणखीनच तापण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टी झालेल्या भागातील पहिल्या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी नुकसान भरपाईवर सरकारला घेरलं होतं. हा त्यांचा दुसरा दौरा आहे. मात्र यावरूनही मुख्य़मंत्र्यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरेंचा हा दौरा पूर्वनियोजित होता. मात्र योगायोगानं त्यांच्या दौऱ्याच्या पुर्वसंध्येलाच नगरपालिका निवडणुका जाहिर झाल्या. त्यामुळे पुढच्या काही दिवसात झेडपी आणि पंचायत समिताच्याही निवडणुका जाहीर होणार हे निश्चित. त्यामुळे कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन शेतकऱ्यांच्या भावनेला हात घालत उद्धव ठाकरेंनी अचूक टायमिंग साधल्याचं बोललं जातंय. त्यामुळे बालेकिल्ला असलेला मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना याचा फायदा होणार का याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: राज्य सरकारचा निर्णय मोठा, शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला एक वर्ष स्थगिती

गेमझोनच्या नावाखाली चालायचे भलतेच प्रकार; प्रायव्हेट रुममधील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा कौल कोणाला? भाऊ, भाई की दादाला?

महिंद्राची जबरदस्त Formula E -कार बाजारात; रेसिंग ट्रॅकवर धुरळा उडवणार

Maharashtra Live News Update: अकोला स्थानिक स्वराज निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळालं चिन्ह

SCROLL FOR NEXT