Uddhav Thackeray and Raj Thackeray at Marathi Unity Rally – Political Alliance Buzz Grows Stronger Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राजकारणात नवा ट्विस्ट: उद्धव-राज युतीवर सस्पेन्स कायम, शिंदेंची नजर

Thackeray vs Thackeray or Together? मराठीच्या विजयी मेळाव्यातील ठाकरेंच्या एकीनंतर आता राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय... संजय राऊतांनी घेतलेल्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो समोर आलाय.. त्यात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर भाष्य केलंय...

Omkar Sonawane

दुसरीकडे नाशिकमध्ये अनौपचारिक गप्पामध्ये बोलताना विजयी मेळावा हा मराठीसाठी होता त्याचा राजकारणाशी संबंध नाही, अशी भूमिका घेत राज ठाकरेंनी युतीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवलाय.. तसे संकेतही उद्धव ठाकरेंसमोरच मराठीच्या मेळाव्यात दिले होते...

त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका तळ्यात मळ्यात असल्याची चर्चा रंगली.. आणि नेमकी हीच संधी हेरुन शिंदे गटाने पुन्हा एकदा राज ठाकरेंना साद घातलीय....

विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ठाकरे ब्रँड जपण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना साद घातलीय... त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालंय... कार्यकर्त्यांनी एकत्र आंदोलनही केलंय... तर मात्र उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत आशादायी असले तरी राज ठाकरे मात्र स्पष्ट सिग्नल देत नसल्याचं चित्र आहे... त्यामुळे महापालिका निवडणुकीआधी ठाकरे ब्रँड जपण्यासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरेंना टाळी देणार की शिंदेंना साथ देणार? यावर मुंबई महापालिकेतील मनसेच्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: स्पाय कॅमेरा अन् ७४ तरुणींचे प्रायव्हेट व्हिडीओ; विमानातील पायलटचं भयंकर कृत्य

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार सतेज पाटील यांचा डान्स

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

SCROLL FOR NEXT