Uddhav Thackeray News Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News: कुटुंबावर आलात तर, फक्त शवासन करावं लागेल; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना इशारा

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंनी सावधगीरीचा इशारा दिलाय.

Ruchika Jadhav

Maharashtra Politics: शुक्रवारी सर्व विरोधी पक्षांची पाटण्यात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. या बैठकीवरुन देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यांना प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना खरमरीत प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

"देवेंद्रजी एवढ्या खालच्या पातळीवर येऊ नका कुटुंब तुम्हाला देखील आहे. आम्ही त्यावर आलेलो नाही. आमच्याकडे व्हाट्सअप चॅट आहेत हे लक्षात ठेवा. जर कुटुंबावर आलात तर केवळ शवासण करावं लागेल हे लक्षात ठेवा, असं उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना ठणाकावून सांगितलं आहे. पाटण्यात झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे कुटुंब बचाओ बैठकीला गेले आहेत.", अशी टीका फडणवीसांनी केली होती.

येत्या १ जुलै रोजी शिवसेना ठाकरे गट महापालिकेवर मोर्चा काढणार आहे. यासाठी आज दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात मुंबई पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक पार पडत आहे. या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) फडणवीसांवर खरमरीत टीका केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT