Uddhav Thackeray addresses Shiv Sainiks, expressing willingness to step down as Shiv Sena chief if allegations against him are proven true. saam tv
महाराष्ट्र

मी शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायला तयार; शिवसैनिकांसमोरच उद्धव ठाकरेंचे मोठं विधान

Uddhav Thackeray Resignation Statement Full Speech: शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान करत पक्षप्रमुखपद सोडण्याची तयारी दर्शवली. आरोप खरे ठरल्यास पदत्याग करण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Omkar Sonawane

मला कुठलीही हाव नाही. माझ्यावर जे आरोप केले जात आहेत, ते जर खरे असतील तर मी आता हे शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायला तयार आहे, असे विधान उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात केलं. शिवसैनिकांना संबोधित करताना ते बोलत होते. ही सोन्यासारखी शिवसेना मला चोर, दरोडेखोरांच्या हातात जाऊ द्यायची नाही. तुमच्यापैकी एक शिवसैनिक पुढे येऊ द्या. तो शिवसेना पक्षप्रमुख होईल, असंही ते म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिवसैनिकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की, आज पर्यंत तुम्ही मला जपले, त्यामुळेचे मी इथपर्यंत आलो आहे. मला नाटक करता येत नाही. काही मिळवायचे असते तर मी आधीच वेगळा मार्ग निवडला असता. ठाकरे पुढे म्हणाले की, गेल्या 10-12 वर्षांपासून त्यांनी पक्षाची धुरा सांभाळली असून अनेक संकटांचा सामना केला आहे. मी पळणारा नाही, खचणारा नाही. वादळं आली तरी मी पहाडासारखा उभा राहीन, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

ही सोन्यासारखी शिवसेना चोरांच्या किंवा दरोडेखोरांच्या हातात जाऊ देणार नाही. तसेच, मला कोणत्याही पदाची हाव नाही. तुमच्यापैकी एखादा शिवसैनिक पुढे आला, तर तोही पक्षप्रमुख होऊ शकतो, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT