Uddhav Thackeray-led Shiv Sena (UBT) prepares for Ramraksha Pathan protest in Nagpur amid political tensions with BJP. saam tv
महाराष्ट्र

फडणवीसांच्या नागपुरात ठाकरेंची रामरक्षा, ठाकरेंचं रामरक्षा पठण, सरसंघचालकांनाही निमंत्रण

Ramraksha protest in Nagpur near Fadnavis residence: राममंदिर दान चोरी प्रकरणावरून ठाकरेंनी आता थेट फडणवीसांच्या नागपुरात जाऊन रामरक्षा आंदोलनाची रणनीती आखलीय. मात्र या आंदोलनस्थळी भाजपनं ठाकरेसेनेची कोंडी केलीय. त्यामुळे नागपूरचं वातावरण तापण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या होमग्राऊंडवर होणाऱ्या या सामन्यावरचा हा रिपोर्ट...

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

अयोध्येतील राम मंदिर देणगी अपहाराच्या मुद्द्यावरून ठाकरेसेना आक्रमक झाली असून राज्यभरात रामरक्षा आंदोलन करण्यात येतंय. मुंबईनंतर आता नागपुरात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानाजवळ उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहेत. भाजपनं मात्र नागपुरात होऊ घातलेल्या रामरक्षा पठण कार्यक्रमावरून ठाकरेसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलाय. ज्याठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याठिकाणी भाजपनं मंडप टाकून ठेवलाय. त्यामुळे कोंडी केली जात असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. तर भाजपनं त्यांच्यावर पलटवार केलाय.

तर म्हणजे ठाकरेसेनेनं मुख्यमंत्र्यांसह

सरसंघचालक मोहन भागवतांनाही रामरक्षा पठणात सहभागी होण्याचं निमंत्रण पाठवलंय. मात्र, नागपुरातील रामरक्षा आंदोलनावरून शिंदेसेना आणि ठाकरेसेना आमनेसामने आले आहेत. शिंदेसेनेचे नेते रामदास कदमांनी टीका करत उद्धव ठाकरेंना डिवचलंय. मात्र, या टीकेनंतर संतापलेल्या ठाकरेसेनेच्या नेत्यानं थेट कदमांचा बापच काढलाय...

नागपुरातलं रामरक्षा आंदोलन यशस्वी व्हावं यासाठी ठाकरेसेनेची जोरदार तयारी सुरू आहे. विदर्भात बैठकांचं सत्र सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात होणार्या या आंदोलनाकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gram Panchayat Elections: राज्यातील 15,155 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल कधी वाजणार? कधी होणार मतदान?

Maharashtra News Live Update: - प्रशासक काळात राज्यातील महापालिकांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार - काँग्रेस आमदार विश्वजित कदम.

मुंबईत गुटखा रॅकेटचा पर्दाफाश; गुजरातहून आलेला ३३ लाखांचा माल जप्त, चेकनाक्यावर अटकेचा थरार

Rohit Sharma update : रोहित शर्मा वनडेमधून रिटायर होणार का? बीसीसीआयचा हिटमॅनच्या कोर्टात चेंडू, पडद्यामागे मोठ्या घडामोडी

45 पाकिस्तानी सैनिक ठार; देशात आणीबाणीची परिस्थिती; सर्व महामार्ग बंद

SCROLL FOR NEXT