Maha Vikas Aghadi leaders engage in intense discussions over the lone Rajya Sabha seat in Maharashtra Saam Tv
महाराष्ट्र

Rajya Sabha Election: उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार? मविआमध्ये पडद्यामागे काय घडतेय?

Maha Vikas Aghadi Rajya Sabha Candidate Final Decision: महाविकास आघाडीत राज्यसभेच्या एका जागेवरुन रस्सीखेच रंगलीय.. मात्र कोणत्या जागेसाठी कोण इच्छूक आहेत... आणि आमदारकीसाठी ठाकरे खरंच खासदारकी सोडणार का?

Bharat Mohalkar

राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली...यात महाविकास आघाडीला संख्याबळानुसार 1 जागा मिळू शकते.... त्यामुळे या एका महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरुय...तर विधानभवनात झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत तीन्ही पक्षांनी राज्यसभेसाठी आग्रह धरल्यानं महाविकास आघाडीत पेच निर्माण झालाय..

खरं तर याआधीच संजय राऊतांनी शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली तर त्यांना राज्यसभेवर पाठवण्याबाबत महाविकास आघाडीत चर्चा होऊ शकते.... असं वक्तव्य केलं.. आणि राज्यसभेच्या निवडणुकीची चर्चा रंगली.... आता सुप्रिया सुळेंनीही पवारांच्या राज्यसभेसाठी इच्छा व्यक्त केलीय.

यानंतर आता जयंत पाटलांनी सुत्रं हलवायला सुरुवात केली..एकीकडे.जयंत पाटील पवारांचा निरोप घेऊन ठाकरेंची भेट घेणार आहेत.....तर दुसरीकडे आदित्य ठाकरे मात्र प्रियंका चतुर्वेदींसाठी आग्रही असल्याची चर्चा आहे...या तीन्ही पक्षातून कोणते उमेदवार इच्छूक आहेत...

पवारांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी फिल्डिंग

ठाकरेसेना प्रियंका चतुर्वेदींना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी इच्छूक

उद्धव ठाकरेंनी राज्यसभेवर जाऊन राष्ट्रीय राजकारणात सक्रीय व्हावं, असाही एक मतप्रवाह

काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा

खरंतर महाविकास आघाडीकडे 46 आमदारांचं संख्याबळ आहे... त्यामुळे महाविकास आघाडीचा एकच सदस्य निवडून येऊ शकतो... मात्र महाविकास आघाडीत राज्यसभेचा पेच सुटला नाही आणि भाजप पाचवा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवून महाविकास आगाडीचा टांगा पल्टी कऱण्याची शक्यता आहे....त्यामुळे महाविकास आघाडी एकाच उमेदवारावर एकमत करणार की एकमेकांना शह देण्यासाठी वेगवेगळी चूल मांडणार... याकडे लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zilla Parishad: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सदस्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

कार्यक्रमातून परतत होते, तेवढ्यातच...; ठाकरे गटाच्या खासदाराचा कारचा अपघात

वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा,थकीत दंड भरा, अन्यथा लायसन्स रद्द

आनंद दिघेंचे जवळचे सहकारी, शिवसैनिक उद्धवराव जगताप यांचं निधन

राज्यात 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा येणार? कायद्याचा पहिला ड्राफ्ट तयार?

SCROLL FOR NEXT