Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : वंचित आणि महाविकास आघाडीच्या युतीची शक्यता संपली; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray on Prakash Ambedkar : संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घ्यायला हवी. आता ते शक्य झालं नाही पण पुढे बघू, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Ruchika Jadhav

MVA seat sharing :

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीमध्ये कोणती जागा कुणाला मिळणार यावर चर्चा सुरू होती. काही जागांवर तिढा देखल होता. अशात वंचित देखील महायुतीत सहभागी होईल असं चित्र दिसत होतं. मात्र नुकत्याच जाहिर झालेल्या फॉर्म्युल्यानुसार वंचित महायुतीत सहभागी नसल्याचं स्पष्ट दिसत आहे.

आज महाविकास आघाडी संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत शिवसेना - 21, काँग्रेस - 17, राष्ट्रवादी - 10 असा फॉर्म्युला ठरला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये वंचितचं नाव नाहीये. त्यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही सर्वांना घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आमच्यासोबत अनेकजण आलेत. पण त्यांनी एकही जागा न मागता पाठिंबा दिला, मी त्यांचे आभार मानतो. प्रकाश आंबेडकर यांनी जरी काही म्हटलं तरी मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. त्यांच्या विषयी प्रेम आहे. संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घ्यायला हवी. आता ते शक्य झालं नाही पण पुढे बघू, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

युती किंवा आघाडी म्हटल्यावर जागावाटपावेळी शक्य असेल तिथपर्यंत चर्चा केली जाते. परंतु शेवटी संगनमताने चर्चा करून पुढे जात असतो. जिंकण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल्यानंतर महत्वकांक्षा बाजूला ठेवून सगळी कामे करावी लागतील. आता बैठक केली, यानंतर देखील एक बैठक होईल, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कोणत्याही जागेवर तिढा नाही - शरद पवार

सांगली असेल किंवा इतर कोणतीही जागा असेल आम्ही चर्चा करून निर्णय घेतले आहेत. दोन दिवसात उमेदवार घोषित करू, असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

महायुतीचं पानिपत‌ करायचं - नाना पटोले

हुकुमशहाविरोधात आम्ही लढत आहोत. जागावाटपाचा तिढा संपला आहे. महाविकास आघाडी म्हणून राज्यात‌ महायुतीचं पानिपत‌ करायचं आहे. लोकांनी निवडणूक हातात घेतली आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajinikanth-Coolie : रजनीकांतच्या चित्रपटासाठी सगळी कंपनीच बंद, कर्मचाऱ्यांना दिली मोफत तिकिटे

क्रिकेटविश्वात खळबळ! भारताच्या माजी क्रिकेटरला ईडीची नोटीस, आज चौकशी, नेमकं प्रकरण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी कोण? सासू, सून की जाऊबाई; लाडकी बहीण योजनेच्या लाभावरुन सासू-सुनांमध्ये महाभारत

ICICI नंतर आणखी एका बँकेचा ग्राहकांना मोठा धक्का, मिनिमम बॅलेंसचं लिमिट अडीचपट वाढवलं

Accident : भाविकांवर काळाचा घाला, पिकअपचा भयंकर अपघात, १० जणांचा मृत्यू, ७ मुलांचा समावेश

SCROLL FOR NEXT