Naresh Mhaske Compared Uddhav Thackeray To Aurangzeb 
महाराष्ट्र

UddhavThackeray: उद्धव ठाकरे आधुनिक काळातील औरंगजेब; शिंदे गटातील नेत्याची घणाघाती टीका

Naresh Mhaske Compared Uddhav Thackeray To Aurangzeb: उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. खासदार म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंची तुलना औरंगजेबशी केली आहे.

Bharat Jadhav

विधीमंडळाचं कामकाज संपल्यानंतरही औरंगजेबाच्या नावावरून राजकारण तापलंय. कुणाल कामराच्या विडंबन काव्यावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंची तुलना थेट औरंगजेबशी केली आहे. उद्धव ठाकरे हे 'आधुनिक औरंगजेब' असल्याची टीका खासदार म्हस्के यांनी केली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे शिवसेना आणि शिंदे गट शिवसेना आमनेसामने आली आहे.

पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी कामरा काही चुकीचं बोलला नाही, असं म्हणत त्यांनी त्याला पाठिंबा दिला. अधिवेशनातही त्यांनी देशाला उत्तम गाणे मिळाले आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला होता. यावर शिंदे गटाकडून जहरी प्रतिक्रिया देण्यात आलीय. औरंगजेबने ज्याप्रमाणे आपल्या वडिलांना आणि भावांना त्रास दिला होता, तसाच त्रास उद्धव ठाकरेंनी दिलाय. स्वत: राज ठाकरे यांनी याबाबत वक्तव्य केलंय. बाळासाहेब ठाकरे यांच्या अखेरच्या दिवसात उद्धव ठाकरेंनी त्यांना खूप त्रास दिला होता.

प्रॉपर्टीसाठीही त्यांनी त्यांच्या भावाला त्रास दिला. प्रॉपर्टीचा वाद त्यांनी कोर्टात नेला होता. आपल्या सख्ख्या भावांना त्यांनी पद्धतशीरपणे दूर केलं. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा वैचारिक वारसा घेतला नाही. पण वडिलांची संपत्ती घेतली. बाळासाहेबांच्या निधनानंतरही ते त्यांच्या वडिलांना त्रास देत आहेत. शिवसेनेच्या विचारधारेचे शत्रू असलेल्यांशी त्यांनी हातमिळवणी केलीय. जे भावाचे नाही झाले नाहीत, ते जनतेचे काय होणार? असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला.

संपूर्ण देशाला उत्तम गाणे मिळालं: उद्धव ठाकरे

अधिवेशन संपल्यानंतर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी कामकाजावरून सरकारवर ताशेरे ओढले होते. अधिवेशनाचे फलित काय? असा सवाल केला होता. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी सरकारवर उपरोधिक टीका केली. महाराष्ट्राला अधिवेशनाने काय दिलं यापेक्षा अधिवेशनात संपूर्ण देशाला उत्तम गाणे दिलंय. हे मान्य करावे लागेल. हे गाणे देशातल्या कानाकोपऱ्यात आणि प्रत्येकाच्या मनात गुणगुणले जातंय. हे अधिवेशन म्हणजे कबरीपासून कामरापर्यंत नेणारे होते, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT