shiv sena mla case  Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: शिवसेना पक्ष अन् चिन्ह पुन्हा मिळणार? 'रोखठोक' मुलाखतीत उद्धव ठाकरेंचे सर्वात मोठे विधान!

Shivsena Chief Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेकडे गेलेले धनुष्यबाण चिन्ह अन् शिवसेना पक्षाबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावरुन सर्वात मोठे विधान केले.

Gangappa Pujari

मुंबई, ता. १२ मे २०२४

लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक, केंद्र सरकारची दडपशाही तसेच फोडाफोडीच्या राजकारणावर सविस्तर भाष्य केले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेकडे गेलेले धनुष्यबाण चिन्ह अन् शिवसेना पक्षाबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालावरुन सर्वात मोठे विधान केले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"धनुष्यबाण ते मशाल चिन्हबाबत लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत. पक्षांतरानंतरही अपात्रतेची केस निकाली निघत नाही. निवडणूक आयोगालाही त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? सर्वोच्च न्यायालयानेही पक्ष ठरवण्याचा निर्णय लोकप्रतिनिधींवरुन ठरवु शकत नाही. अद्याप याचा निकाल लागलेला नाही. अजूनही याचा निर्णय आलेला नाही.

"सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल याची खात्री आहे. कारण तसं घटनेच्या परिशिष्ठ १० मध्ये नमूद केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी असताना पंतप्रधान माझ्या शिवसेनेला, जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली. त्याला नकली शिवसेना म्हणत आहेत. याचा अर्थ उघड आहे, निवडणूक आयोग हा त्यांचा नोकर आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेही हे चिन्ह अन् पक्ष आपल्याला देऊ नये, यासाठी पंतप्रधान दबाव आणतात की काय? असा प्रश्न पडलेला आहे," अभी भिती उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

मोदींवर घणाघात..

"राजकारणात जन्म देणाऱ्या शिवसेनेच्या कुशीवर तुम्ही वार केलात. तसेच महाराष्ट्राशी गद्दारी केली. नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. महाराष्टातून ४० खासदार निवडून आले होते. महाराष्ट्राने मोदींना भरभरुन दिलं. पण त्यांनी गद्दारी केली. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवले, महाराष्ट्राशी बेईमानी केली, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT