Maharashtra leaders Devendra Fadnavis, Uddhav Thackeray, and Sanjay Raut spotted traveling together on a flight to Nagpur, sparking political speculation. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra politics : फडणवीसांसोबत विमानात काय बोलणं झालं? ठाकरेंनी एका वाक्यात दिले सूचक संकेत, म्हणाले...

Uddhav Thackeray Latest News : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या विमान प्रवासात 'उच्च दर्जाची आणि उच्चस्तरीय चर्चा' झाल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी बंडखोर खासदारांवर टीका करत महाराष्ट्रभर दौरा सुरू केला.

Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray Devendra Fadnavis flight meeting : शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या विमान प्रवासाबाबत आज सूचक विधान केले आहे. शुक्रवारी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानाने एकत्र प्रवास केला होता. या विमान प्रवासादरम्यान दोघांमध्ये "उच्च दर्जाची आणि उच्चस्तरीय चर्चा" झाल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. कालच्या या भेटीत किंवा बैठकीत नेमके काय ठरले, याचा वृत्तांत येत्या काही दिवसांतच सर्वांसमोर येईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

गद्दारांच्या मतदारसंघात दौरा:

उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि विनायक राऊत यांचा फुटीर/बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये दौरा आजपासून सुरू झाला असून, त्याची सुरुवात यवतमाळमधून होत आहे. त्याआधी ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी बंडखोरांवर आणि शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली.

बंडखोरांवर टीका

"शिवसेना प्रमुखांचा चेहरा आणि मशाल बघून मतदारांनी पार्श्वभूमी न बघता ज्या उमेदवारांना निवडून दिले, त्यांनी गद्दारी केली. अशा लोकांमुळे मला लाज वाटते की हे बुरखे पांघरून इतकी वर्षे सोबतीला कसे राहिले?" असे ठाकरे म्हणाले. तसेच चुकीचे उमेदवार दिल्याबद्दल ते मतदारांची आणि शिवसैनिकांची क्षमा मागण्यासाठी महाराष्ट्रभर फिरणार आहेत.

आमदारांच्या फुटीवेळी '५० खोके एकदम ओके'ची चर्चा होती. खासदारांनी फुटण्याचे कारण 'निधी' असल्याचे स्वतःच मान्य केले आहे. मग आमदारांना ५० कोटी मिळाले असतील, तर खासदारांना किती मिळाले? असा सवाल त्यांनी केला.

शिंदे गटाला प्रत्युत्तर:

'आता दौरा करून फायदा नाही' या शिंदे गटाच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, "मी दौरा केला होता म्हणूनच हे खासदार निवडून आले होते, तेव्हा विरोधकांना घरी बसवले होते." शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव नाही, पण आमच्या भरोशावर निवडून आलेल्या खासदारांना मात्र गद्दारीसाठी भरघोस हमीभाव (निधी) मिळाला आहे, असा टोला त्यांनी लगावला. शुक्रवारी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित विमान प्रवासाचा फोटो समोर आला होता. त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, विमानामध्ये आमची 'उच्च दर्जाची आणि उच्चस्तरीय चर्चा' झाली असून, काय ठरले ते येत्या काही दिवसांत कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benefits Of Guava : बॅड कोलेस्ट्रॉल वाढलंय? रोज पेरू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल होईल कमी; जाणून घ्या फायदे

Manasi Parekh: नेपाळमधील पूरात अडकली, शेवटी...; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला थरारक अनुभ

Maharashtra News Live Update: भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत FDA ची ‘एन्ट्री’

Sambhajingar: डेटिंग ॲपवर तरुणांना जाळ्यात अडकवायचं, आलिशान बारमध्ये न्यायचं नंतर...; संभाजीनगरमध्ये 'लेडीज गँग'चा पर्दाफाश

धक्कादायक! मंत्री आदिती तटकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT