आशिया कप २०२५ मध्ये भारत-पाकिस्तान सामना दुबईमध्ये होणार
ठाकरे गटाचे शरद कोळी यांनी सामन्याला तीव्र विरोध
हॉटेल चालकांनी मॅच स्क्रीन करू नये, अन्यथा टीव्ही फोडण्यात येईल, असा ठाकरेंचा इशारा
सोशल मीडियावरही सामन्याला होतोय मोठा विरोध
आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तानची १४ सप्टेंबर रोजी दुबईमध्ये आमनेसामने येणार आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही पहिल्यांदा मैदानात भिडणार आहेत. मात्र, या सामन्याला ठाकरे गटाने विरोध दर्शवला आहे. भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार असल्याचा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी हॉटेल चालकांना धमकीवजा इशारा दिला आहे.
भारत पाकिस्तान सामन्याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, याच सामन्याला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी विरोध केला आहे. तर या सामन्याविरोधात ठाकरे गटानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचे शरद कोळी यांनी म्हटलं की, 'भारत आणि पाकिस्तानची मॅच दुबईत होणार आहे. ज्या पाकिस्तानने महाराष्ट्र आणि देशातील आई-बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम केलं, या पापी नीच पाकिस्तानसोबत भारताची मॅच होणार आहे'.
'मला महाराष्ट्रातील हॉटेल चालकांना विनंती करायची आहे की, 'पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी भारतीयांची डोक्यात गोळ्यात हत्या केली. या पाकिस्तानसोबत मॅच होणार आहे. ती मॅच कोणत्याही हॉटेल मालक चालकांनी टीव्हीवर दाखवू नये. आपलं भारतावर प्रेम असेल, कोणीही मॅच टीव्ही किंवा स्क्रिनवर दाखवणार नाही. जर मॅच दाखवल्यास त्यांचा टीव्ही फोडण्यात येईल. त्याला जबाबदार हॉटेल मालक चालक राहतील, असेही कोळी म्हणाले.
पहलगाम हल्ल्यात जीव गमावणाऱ्या शुभम द्विवेदी यांची पत्नी ऐशान्या द्विवेदी यांनीही भारत-पाकिस्तानच्या सामन्याला विरोध केला आहे. या सामन्याला बीसीसीआयने मंजुरी द्यायला नको होती. आता या सामन्यावर बहिष्कार घालण्याचे काम देशातील नागरिकांनी करावं, असं आवाहन ऐशान्या यांनी केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.