Nashikn Shivsena Latest News Saam TV
महाराष्ट्र

Shivsena : नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; डझनभर माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येते आहेत. नाशकात शिंदे गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

साम टिव्ही ब्युरो

नाशिक : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येते आहेत. नाशकात शिंदे गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातील डझनभर माजी नगरसेवक शिंदे गटाने आपल्या गळाला लावले आहेत. शुक्रवारी नाशिकमधील १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. (Latest Marathi News)

एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्यासह ४० हून अधिक आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला गळती सुरूच आहे. एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे नव्याने पक्षउभारणीची तयारी करत असताना, दुसरीकडे शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी नाशिकचा दौरा केला होता.

शिवसेनेतून कुणीही बाहेर पडलेलं नाही, सगळे पदाधिकारी माझ्या भेटीसाठी आले आहेत. फक्त पालापाचोळा उडून गेला, असं राऊतांनी म्हटलं होतं. मात्र, संजय राऊत यांच्या नाशिक (Nashik) दौऱ्यानंतरही नाशिकमध्ये शिवसेनेला लागलेली गळती थांबलेली दिसत नाहीये.

कोणकोणते नगरसेवक शिंदे गटात ?

माजी नगरसेवक अजय बोरस्ते, सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, डी. जी. सुर्यवंशी, सुदाम ढेमसे, श्यामकुमार साबळे, चंद्रकांत खाडे, सुवर्णा मटाले, पुनम मोगरे, जयश्री खर्जुळ, ज्योती खोले यांच्यासह अन्य माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. ठाकरे गटाने मुंबईसह नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचा नाशिक दौरा देखील झाला होता. मात्र आता नाशिकच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack - BP : श्रावणात उपवास करताय? हृदयविकार अन् हाय बीपीच्या रुग्णांनी 'ही' घ्या खबरदारी, नाहीतर जीवाचा धोका वाढेल

Housing Society Rule : सोसायटीच्या शेजारी दारूचे दुकान? महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; पाहा काय आहे नवीन नियम

Maharashtra News Live Update: नवी मुंबईतील एका शाळेला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल

Bus Accident News : प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात, ७ जणांचा जागीच मृत्यू; ११ प्रवासी गंभीर जखमी

Urine Infection : पावसाळ्यात रोज 'हे' सुपरफूड खा; बाजारात सहज मिळेल, युरिन इन्फेक्शनपासून वाचाल

SCROLL FOR NEXT