Maharashtra Politics : विरोधकांनी घेरताच शिंदे सरकार एक पाऊल मागं; GR दोनच दिवसात बदलला, 'तो' शब्दही वगळला

'आंतरजातीय' या शब्दावरून विरोधकांनीही सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. अखेर शिंदे सरकारने हा शब्द वगळला आहे.
Eknath Shinde News, Devendra Fadnavis News
Eknath Shinde News, Devendra Fadnavis Newssaam tv
Published On

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने महिला व बाल कल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्यांची आंतरजातीय वाह समन्वय समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता. या समितीच्या घोषणेनंतर मोठा वादंग निर्माण झाला होता. 'आंतरजातीय' या शब्दावरून विरोधकांनीही सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. अखेर शिंदे सरकारने हा शब्द वगळला आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde News, Devendra Fadnavis News
Hinduja Group : राज्यात हिंदुजा समूह करणार ३५ हजार कोटींची गुंतवणूक; CM शिंदेंच्या उपस्थितीत करार

आता फक्त आंतरधर्मीय विवाहांसाठीच ही समिती काम करणार आहे, तसा बदल करत नवा शासन निर्णय राज्य सरकारने (Eknath Shinde) जाहीर केला आहे. त्याशिवाय यासाठी हेल्पलाईनची घोषणाही केली आहे. या समितीतून नांदेडच्या अॅड. योगेश देशपांडे यांना त्यांच्या मागणीवरुन मुक्त करण्यात आलं आहे. त्यांच्या जागी मुंबईच्या इरफान अली पिरजादे यांचा समावेश करण्यात आला आहे.

आंतरधर्मीय समिती कशी काम करणार?

नोंदणीकृत अथवा अनोंदणीकृत विवाह, धार्मिक स्थळी करण्यात आलेले विवाह, पळून जाऊन केलेले विवाह अशा प्रकारे आंतरधर्मीय विवाह केलेल्या व्यक्तींची इत्यंभूत माहिती प्राप्त करणे. नवविवाहीत मुली अथवा महिला तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करुन सद्य:स्थितीत ते एकमेकांच्या संपर्कात आहेत किंवा कसे? याबाबत माहिती घेणे. स्वतःच्या कुटुंबियांच्या संपर्कात नसलेल्या मुली अथवा महिला यांची त्यांच्या आई- वडिलांच्या सहाय्याने माहिती घेणे. आई वडिल इच्छुक नसल्यास तज्ञ समुपदेशकाद्वारे त्यांचे समुपदेशन करणे,असे काम समिती करणार आहे. या समितीत एकूण १३ सदस्यांचा समावेश आहे.

Eknath Shinde News, Devendra Fadnavis News
Sangli : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; ग्रामपंचायतमध्ये निवडून येण्यासाठी उमेदवारांनी गाठला अंधश्रद्धेचा कळस

दरम्यान,ही समिती खालील विषयाशी संबंधीत विभागीय तसेच जिल्हा स्तरावरील अधिकारी यांची आवश्यकतेनुसार बैठका घेऊन आढावा घेईल.नोंदणीकृत विवाह, अनोंदणीकृत आंतरधर्मीय विवाह,धार्मिक स्थळी करण्यात आलेले आंतरधर्मीय विवाह,पळून जाऊन केलेले आंतरधर्मीय विवाह, विवाह केलेल्या नवविवाहीत मुली अथवा महिला तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून सद्य:स्थितीत ते एकमेकांच्या संपर्कात आहेत किंवा कसे याबाबत माहिती संकलीत करणे,त्यांचे समुपदेशन करणे हे या समितीचे मुख्य काम राहणार आहे.

Edited By -Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com