akola saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Faction : अकाेल्यात सेनेच्या कार्यकर्त्यांची पीक विमा कंपनी कार्यालयात ताेडफाेड

दातकर यांच्या आंदाेलनाचा आज तिसरा दिवस आहे.

Siddharth Latkar

- हर्षदा सोनोने

Akola News : शेतक-याला न्याय मिळालाच पाहिजे अशा घाेषणा देत आज (गुरुवार) उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अकाेल्यातील एका पीक विमा कार्यालयाची तोडफोड केली. या घटनेत कार्यालयातील खुर्च्या, टेबलचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Maharashtra News)

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या (farmers) प्रलंबित मागण्या निकाली काढण्यात जिल्हा प्रशासनासह शासन कुचकामी ठरल्याचा आरोप करीत उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदचे गटनेता गोपाल दातकर हे गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. दातकर यांच्या आंदाेलनास शेतक-यांचा माेठा पाठींबा मिळू लागला आहे.

दरम्यान आज दुपारच्या सुमारास उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी थेट एका पीक विमा कार्यालयावर धडक दिली. तेथे घाेषणाबाजी करीत तोडफोडीस प्रारंभ केला. आगामी काळात शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करु असा इशारा प्रशासनास सचिन बहाकर (शिवसैनिक, उद्धव ठाकरे गट) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'आधी गोळी झाडायची, नंतर प्रश्न विचारायचे, हे खपवून घेणार नाही; उच्च न्यायालयानं FDAला फटकारलं

Coconut Kheer Recipe: सणासाठी घरी झटपट बनवा चविष्ट आणि स्वादिष्ट खीर, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: शिरूर बायपासजवळ चार वाहनांचा भीषण अपघात

सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

Hair Care: केस गळती कमी करुन १ महिन्यात केस होतील दुप्पट लांब; मेथी दाण्याच्या करा असा वापर

SCROLL FOR NEXT