Uddhav Thackeray  Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : सूरतेत एक जादू झाली अन् त्यांचा उमेदवार बिनविरोध आला; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

Uddhav Thackeray press conference : सूरतच्या जागेवरून विरोधकांकडून टीका सुरु आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे. 'सुरतेत एक जादू झाली आणि त्यांचा उमेदवार बिनविरोध निवडून आला, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी टीका केली.

Vishal Gangurde

गिरीश कांबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

नांदेड : सूरत लोकसभा मतदारसंघावरून राजकारण पेटलं आहे. सूरत लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज अवैध ठरला. तर भाजप उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आल्याचं जाहीर करण्यात आलं. यावरून विरोधकांकडून टीका सुरू आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे. 'सुरतेत एक जादू झाली आणि त्यांचा उमेदवार बिनविरोध निवडून आला, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं.

उद्धव ठाकरे यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे म्हणाले, 'मला सभा घ्यायची होती, पण वेळेची खेचाखेची सुरू आहे. आज संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपत आहे. त्यामुळे जाहीर सभा घेता येत नाहीये. मी वसंतराव चव्हाण यांना विनंती केली, आणि त्यांनी ती मान्य केली. मी माझ्या शिवसैनिकांना निवडणुकीच्या प्रचारात मदत करण्यास सांगितले आहे. माझे शिवसैनिक तुमच्या विजयासाठी काम करतील. २०१९ साली पहिल्यांदा महाविकास आघाडीचे सरकार आले'.

'मधल्या काळात बंडखोरी झाली नसती, तर राज्य वेगळ्या वळणावर नेलं असतं, विकास झाला असता. सगळीकडे सर्व मित्रपक्षांचे कार्यकर्ते जोमाने आणि एकदिलाने महाविकास आघाडीचे कार्यकरते काम करत आहेत. तुतारी मशाल आणि पंजा आपलेच निशाणी आहे, असे समजून काम करत आहेत. सगळ्यांच्या मनात एकच भीती आहे की, जे घटना बदलतील, असा आरोप ठाकरेंनी केला.

'महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफी केली. ज्या शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी काम केले, त्यांचेच नाव सातबाऱ्यांवरून नाव काढले. शिवसेनेचा सातबारा दुसऱ्यांच्या नवावर केला. तुमच्याशी असे वागू शकतात तर आमचाही सातबारा कोरा करतील. सुरतमध्ये जादू झाली आणि भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat: भोंदू खरातचा पंचतारांकित 'अड्डा', मुंबईतल्या हॉटेलमधून चालवायचा हवाला रॅकेट

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT