Uddhav Thackeray  saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News: सरकार आता मतपेटीतून न येता खोक्यातून जन्माला येत आहे; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

'सरकार आधी मतपेटीमधून सत्तेत यायचे, आता खोक्यातून येत आहे, अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.

Vishal Gangurde

Uddhav Thackeray News: राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्याने राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. या राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यात दौरा सुरू केला आहे. आज विदर्भातील दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 'सरकार आधी मतपेटीमधून सत्तेत यायचे, आता खोक्यातून जन्माला येत आहे, अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, 'सध्या जाहीर सभेचा काळ नाही. त्यामुळे मी सभेसाठी फिरत नाही. कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी फिरत आहे. सर्व कार्यकर्त्यांना मातोश्रीवर भेटणे शक्य नाही. या आव्हानात्मक काळात कट्टर शिवसेना कार्यकर्त्यांना भेटत आहे'.

'आधी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळविला जात आहे. पक्षाचे नाव माझ्यासोबत राहील. निवडणूक आयो त्यांचा अधिकार नाही. मी रुग्णालयात असताना रात्री हालचाली, गाठीभेटी चालल्या होत्या. त्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

'कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे अशी परिस्थिती सध्याच्या सरकारची आहे. पूर्वी सरकार मतपेटीतून जन्माला सत्तेत यायचे, आता खोक्यातून जन्माला येत आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

'तुम्ही मतदान कोणालाही करा, सरकार माझंच येईल, असे काही बोलू लागले आहेत. असा पायंडा पडला तर दमटाट्या किंवा पैशाचा खेळ होऊ शकतो. त्याचबरोबर तो राज्याचा मुख्यमंत्री किंवा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असे ठाकरे म्हणाले.

'यामुळे शिवसेनाप्रमुखांनी 'राइट टू रिकॉल' योजना मांडली होती. मी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी चूक केली असेल. तर आमच्यासह जो कोणी करेल त्यांना पुन्हा बोलविण्याचा अधिकार द्यायला पाहिजे का, यावर देशात विचार व्हायला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.  

तर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर उद्धव ठाकरे म्हणाले, 'उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा मी सुद्धा ऐकतोय'. बंडखोर आमदारांशी संपर्क झाला का, यावर बोलणं उद्धव ठाकरे यांनी टाळलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

SCROLL FOR NEXT