
Sanjay Raut News: कालपासून उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ झंझावाती दौऱ्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज ते अमरावतीत सभा घेणार आहेत. त्यांची सभा होण्यापूर्वी खासदार नवनीत राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ घालण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या सभा स्थळावर राणा यांचे कार्यकर्ते हनुमान चालीसा पठण करणार आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते दाखल झालेत. या सर्वांवरुन खासदार संजय राऊतांनी नवनीत राणांचा चांगलाच समाचार घेतला आहे. (Latest Marathi News)
या बाई परत लोकसभेत जातील याची खात्री नाही
हनुमान चालीसाचं पठण त्यांनी राष्ट्रावादीच्या फुटलेल्या गटासमोर करावं. बॅनर फाडल्याची किंमत त्यांना चुकवावीच लागेल. अमरावतीत परत त्यांना निवडणुका लढायच्या आहेत. पण १०० टक्के सांगतो या बाई परत लोकसभेत जातील याची खात्री नाही, अजिबात जाणार नाहीत त्या लोकसभेत. कारण त्यांना बजरंगबली आणि हनुमानच धडा शिकवणार आहे. कर्नाटकात त्यांना चांगलाच धडा मिळाला आता महाराष्ट्रात त्यांना धडा मिळणार आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी नवनीत राणा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
शिंदे गटातील चार विद्यमान आमदारांना डिच्छू मिळणार असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी संजय राऊतांना केलं होतं. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा एकदा या मुद्दायवर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले की, विद्यमान चार आमदारांना, मंत्र्यांना काढून नवीन मंत्री घ्यावेत अशी त्यांची भूमिका आहे. मुळात महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. अजित पवार यांच्याबरोबर ८ मंत्र्यांनी शपथ घेतली असून अद्यापही खाते वाटप होऊ शकले नाही. खरंतर शपथ घेतल्यानंतर पुन्हा 24 तासात खातेवाटप करण्याची परंपरा आहे.
अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे असे टोलेजंग भाजपमध्ये घेऊन सुद्धा हे आठ आठ दिवस बिन खात्याचे मंत्री म्हणून खाते वाटपाशिवाय बसले आहेत. कोणत्या प्रकारचा गोंधळ आहे हे समजत आहे. अजित पवार हे बिन खात्याचे उपमुख्यमंत्री आहेत. एवढे मोठे नेते सध्या बिन खात्याचे मंत्री आहेत. धनंजय मुंडे बिन खात्याचे मंत्री, हसन मिया मुश्रीफ बिन खात्याचे मंत्री एकंदरीत राज्याची परिस्थिती आहे, अशी टीका राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.